Nawaz Sharif : भारताशी संबंध सुधारण्यासाठी नवाज शरीफ आलेत घायकुतीला; तपासा, पाकिस्तानी लष्कर लागलेय का नव्या “कारगिल”च्या तयारीला??

Nawaz Sharif

Nawaz Sharif  एकीकडे भारताशी संबंध सुधारण्यासाठी नवाज शरीफ ( Nawaz Sharif ) आलेत घायकुतीला; तपासा, पाकिस्तानी लष्कर लागलेय का नवे कारगिल युद्ध घडवायच्या तयारीला??, असे विचारायची वेळ पाकिस्तानातल्याच काही घडामोडींनी आली आहे. शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर दोनच दिवसांच्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले. त्या पार्श्वभूमीवर नवाज शरीफ यांनी “नवी पहल” करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण धाडले होते, पण प्रत्यक्षात मोदींनी पाकिस्तानात न जाता परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना पाठविले. त्याबद्दल देखील नवाज शरीफ यांनी समाधान व्यक्त केले.Nawaz Sharif

मूळात शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने नवाज शरीफ यांनी भारतीय पत्रकारांशी संवाद साधत “नवी पहल” केली. भारत आणि पाकिस्तान यांनी जे काही जुने घडले ते विसरून जावे. जिथे संबंध थांबलेत, तिथून ते पुढे सुरू करावेत. पर्यावरण, क्रीडा, हवामान बदल, उद्योग व्यवसाय वगैरे क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी एकत्र काम करावे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने त्यांचा क्रिकेट संघ पाकिस्तानला पाठवावा. भारत आणि पाकिस्तान यांच्या नेत्यांचे संबंध चांगले नसतील, पण एकमेकांच्या लोकांचे संबंध चांगले आहेत. आपली संस्कृती, भाषा, परंपरा, खाद्यपदार्थ समान आहेत, यावर लक्ष केंद्रित करावे, असे “उच्चशिक्षित व्याख्यान” नवाज शरीफ यांनी भारतीय पत्रकारांसमोर दिले होते. यामध्ये बरखा दत्त आणि अन्य लिबरल पत्रकारांचा समावेश होता. अर्थातच नवाज शरीफ यांच्या “उच्चशिक्षित संवादा”च्या बातम्यांना भारतीय लिबरल मीडियामध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे पाकिस्तान खरंच खूप बदललाय. त्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झालाय, वगैरे मखलाशी लिबरल मीडियातून सुरू झाली.



पण असली मखलाशी भारतीयांना नवीन नाही. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तान जेव्हा सर्व पातळ्यांवर अडचणीत आलाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्णपणे “कॉर्नर” झालाय, त्यावेळी पाकिस्तानचा कुठलातरी प्रमुख नेता “सॉफ्ट” विषय घेऊन किंवा “बॅक डोअर डिप्लोमसी”द्वारे भारताशी संबंध सुधारण्याच्या गप्पा करतो. त्यासाठी भारतीय मीडियातल्या लिबरल पत्रकारांना किंवा बॉलीवूड मधल्या कलाकारांना हाताशी धरतो आणि भारतीय मुत्सद्दी वर्तुळावर गारुड करण्याचा प्रयत्न करतो. नवाज शरीफ यांचा 2024 मधला भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न याच स्वरूपाचा आहे. त्या पलीकडे काही नाही.

– लाहोर बस यात्रा आणि कारगिल

1999 मध्ये भारताने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानचा असा “दुहेरी” अनुभव घेऊन झालाय. एकीकडे याच नवाज शरीफ वाजपेयींबरोबर लाहोरच्या ऐतिहासिक किल्ल्यात वाटाघाटी करत होते. लाहोर बस यात्रेच्या आनंदात मग्न होते. त्याचवेळी त्यांनीच नेमलेले लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ बकरवालांना पाठवून कारगिल मध्ये घुसखोरीची तयारी करत होते. लाहोर बस यात्रेमध्ये त्यावेळचे काही बॉलिवूडचे कलाकार सामील झाले होते. ते भारत – पाकिस्तान मैत्री संबंधांचे गोडवे गात होते आणि मुशर्रफ आणि त्यांची सेना कारगिल मध्ये घुसखोरी करत होते. हे सगळे त्यावेळी समांतर पातळी सुरू होते. लाहोर बस यात्रेची धुंदी उतरल्यानंतर कारगिल मधली घुसखोरी लक्षात आली. भारतीय लष्कराने तिथे युद्ध करून पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावले. आपली सर्व पर्वत शिखरे घुसखोरमुक्त केली. पण हे सगळे लाहोर बस यात्रेचे गारुड उतरल्यानंतर झाले.

आता देखील नवाज शरीफ असेच लाडात आले आहेत. त्यांनी भारतीय पत्रकारांना लाहोर मधल्या त्यांच्या जटी उमरा मधल्या आलिशान निवासस्थानी बोलवून त्यांच्याशी गप्पा मारल्या. बरखा दत्तला त्यांनी मुलाखत दिली. त्यातून भारत पाकिस्तान संबंधांचे असेच गोडवे गायले. भारताला कटू इतिहास विसरायला सांगितले. भारतीय पत्रकार देखील खुश झाले. त्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंट वर नवाज शरीफ यांच्याशी झालेला “सुखसंवाद” शेअर केला. त्यामुळेच भारताने सावध राहायची गरज आहे.

– पाकिस्तानी गोड मिठाईत विष

एकीकडे नवाज शरीफ असे गोड गोड बोलत असताना दुसरीकडे पाकिस्तानी लष्कर किंवा त्यांची गुप्तहेर संघटना आयएसआय नव्या घुसखोरीच्या तयारीत तर नाही ना, हे तपासायला हवे. तसे असेल तर त्यावर आत्तापासूनच कठोर कारवाई करायला हवी. पाकिस्तानी गोड मिठाईच्या आत नेहमीच दहशतवादाचे आणि घुसखोरीचे विष असते, हा इतिहास जरी नवाज शरीफ यांनी विसरायला सांगितला असला, तरी भारतीयांनी तो विसरता कामा नये!!

Nawaz Sharif new initiative makes India cautious of new infiltration by Pakistan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात