विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ashish Shelar ज्या पद्धतीने मुंबईतील अनेक भूखंड उबाठा सेनेने बळकावले तसेच धारावीमध्ये असणारा नेचर पार्कचा 37 एकरचा भूखंड दुसऱ्या मुलाचे निसर्ग व प्राणी प्रेम दाखवून घराजवळची ही जागा बळकावयाची आहे म्हणूनच धारावीकरांची माथी भडकवली जात आहेत. निर्बुद्ध आदित्य ठाकरे हे शहर नक्षलवाद्यांचें प्रवक्ते झाले आहेत, असे गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.Ashish Shelar
धारवी पुनर्विकासाला विरोध करीत उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे हे निर्बुद्धासारखे अभ्यास न करता बोलत आहेत असे सांगत त्यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. धारावीमध्ये 70 टक्के दलित, मुस्लिम आणि मराठी माणसे आहेत. त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहेत, मुंबई महापालिकेला 15 हजार कोटी रुपये मिळणार आहेत तसेच मुंबईकरांना 430 एकरमधील 37 टक्के जागेत खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान यासारखी मोकळी जागा मिळणार आहे. एक वाहतूक हब ही याच परिसरात उभा राहणार आहे, मग धारावीकर, मुंबईकर, मुंबई महापालिका आणि शासन यांचा फायदा होणार असताना आदित्य ठाकरे यांचा विरोध का? असा थेट सवाल आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला आहे.
लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करून, धारावीकरांना हे सरकार तुमच्या विरोधी आहे असं वातावरण निर्माण करणे, हा उबाठा आणि आदित्य ठाकरे यांचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. हा एक आंतराष्ट्रीय कट असून शहरी नक्षलवाद्यांचे आदित्य ठाकरे हे प्रवक्ते झाले आहेत, असे आरोप आमदार अॅड आशिष शेलार यांनी केले आहेत.
आज हे बोलतोय म्हणून आम्ही कंत्राटदार प्रेमी आहेत, असेही ते आरोप आमच्यावर करतील पण त्याची तमा न बाळगता आम्ही आज मुंबईच्या, मुंबईकरांच्या हिताचे आहे म्हणून सत्य मांडण्यासाठी बोलणार आहोत. जे मुद्दे आम्ही मांडतो आहे त्याची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी आणि खासदार वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पक्षांनी द्यावी आम्ही कधीही खुल्या चर्चेला तयार आहोत, असे आव्हान ही त्यांनी केले.
7 लाखांचा आकडा कुठून आला?
ज्या धारावीमध्ये घरे किती?, सन 2000 आधीची किती?, सन 2000 ते 2011ची किती? आणि 2011च्या पुढे ज्याला आपण ती किती?, दोन माळयाची किती?, निवासी आणि औद्योगिक गाळे किती याचा सर्व्हेच अद्याप पूर्ण झालेला नाही. आमच्या माहितीप्रमाणे केवळ 20 हजार घरांचा सर्वेक्षण झाले आहे. अजून खूप मोठा विभाग बाकी असतानाही जो भ्रम. खोटं आणि कट केला जातोय, कारण आदित्य ठाकरे निर्बुद्ध आहेत. शहरी नक्षलवाद्यांचे प्रवक्ते आहेत. त्यांनी सात लाख घरे असा काल जो उल्लेख केला तो आकडा आला कुठून ?, धारावीच्या शिवसेना शाखेत बसून खोटे आकडे निर्माण करण्याचं षडयंत्र आदित्य ठाकरे करीत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मशाल नावाच्या एका संस्थेने जो पहिला सर्व्हे केला, जो अंतिम नाही पण त्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, 60 हजार घरे ही सन 2000 पूर्वीची आहेत. ज्यांना सशुल्क संरक्षण सरकारने दिले अशी सन 2011 पर्यंतची घरे 15 हजार असतील असे सर्वसाधरण माहिती समोर आले आहे. दोन मजली अशी दीड ते दोन लाख असावीत अशी आकडेवारी आमच्याकडे आहे. ही सर्वसाधारण माहिती आहे त्यामध्ये कमी, जास्त होऊ शकते. मग महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानातला एक भाग म्हणून प्रत्येकाला घर जर मिळणार असेल तर आदित्य ठाकरे यांचा त्याला विरोध का? असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App