विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या वार्षिक प्रतिनिधी सभेत जे अनेक निर्णय घेतले आणि ज्या अनेक विषयांवर जी भाष्ये केली, त्यापैकी एक विषय राहुल गांधींच्या लंडन मधल्या दौऱ्याचा होता. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी संघाच्या नेहमीच्या पठडीत अतिशय उच्चशिक्षित भाषेत त्या संदर्भात “गीता वाचली” आहे, पण त्यामुळेच केंब्रिजचाच गोंधळ बरा होता असे म्हणायची वेळ आली आहे!! RSS general secretary dattatrya hosbale expected political maturity and political realism from rahul Gandhi, is it worth??
दत्तात्रय होसबळे यांनी राहुल गांधींकडून जबाबदार विरोधी पक्ष नेत्याच्या वर्तनाची अपेक्षा करून वास्तव पाहण्याची आणखी एक अपेक्षा व्यक्त केली आहे. राहुल गांधी आणि जबाबदारी, तसेच राहुल गांधी आणि वास्तव हे शब्द तरी एकमेकांशी जुळतात का?? हे दोन शब्द राहुल गांधींच्या बाबतीत परस्पर विसंगत आहेत. राहुल गांधींनी जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केली आहे. संघाच्या उच्चशिक्षित भाषेत ती कदाचित योग्यही असेल, पण ती कोणाकडून करावी??, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे.
रणनीतीकारांचा सल्ला पाळला का??
राहुल गांधींच्या काँग्रेसच्या सल्लागारांनी आणि निवडणूक रणनीतीकारांनी राहुल गांधींना हजार वेळा सांगितले असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यक्तिगत टार्गेट करू नका. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होते. पण राहुल गांधींनी पैसे देऊन नेमलेल्या निवडणूक रणनीतीकारांचे कधी ऐकले आहे काय?? रणनीतीकारांनी दिलेला सल्ला राहुल गांधींनी पाळला आहे काय?? फार जुन्या इतिहासात जायची जरूरत नाही. 2017 पासूनचा इतिहास तपासला तर राहुल गांधी आणि जबाबदारी यातला परस्पर विरोध देखील समोर येतो. राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक काँग्रेसने लढवली. त्यात ते पराभूत झाले. नेहमीच्या राजकीय रुटीननुसार त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पण खऱ्या अर्थाने गांधी परिवार म्हणून काँग्रेसच्या विशिष्ट “उच्च दर्जाच्या” जबाबदारीतून ते बाजूला झाले का?? म्हणजेच सामान्य भाषेत बोलायचे झाले तर खऱ्या अर्थाने ते जबाबदारीतून मोकळे झाले का?? या प्रश्नाचे उत्तर संघटनात्मक पातळीवरच्या पराभवाच्या जबाबदारीतून ते मुक्त झाले. पण त्यांच्या “उच्च दर्जातून” म्हणजे थोडक्यात घराणेशाहीतून ते मुक्त झाले नाहीत, हे आहे!!
पॉलिटिकल ऍसेट ते पॉलिटिकल लायबिलिटी
म्हणजे एकेकाळी जो गांधी परिवार काँग्रेससाठी “पॉलिटिकल ऍसेट” होता तोच गांधी परिवार राहुल गांधींच्या रूपाने “पॉलिटिकल लायबिलिटी” बनला तरी देखील राहुल गांधींचे राजकीय वर्तन सुधारले आहे का??, याचे उत्तर त्यांच्या केंब्रिज मधल्या भाषणातून दिसते.
संघावर अस्थानी टीका, तरीही…
राहुल गांधींना भारत असले वास्तव दिसले असते, तर भले त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी वैचारिक मतभेद असतील. तो लोकशाहीचा महत्त्वाचा घटक देखील असेल. पण त्यांना संघामध्ये बोको हराम सारखी किंवा आयएसआयएस सारखी दहशतवादी संघटना दिसली नसती, तर त्या ऐवजी टीकाच करायची असती तर संघाची पठाडी दिसली असती किंवा स्तुती करायची असती, तर संघाचे सेवा कार्य दिसले असते. पण राहुल गांधींना संघात बोको हराम सारखी दहशतवादी संघटना दिसली, यातच त्यांच्या तोकड्या राजकीय आकलनाचे वास्तव दिसते आणि तरीही दत्तात्रय होजबळे राहुल गांधींकडून जबाबदार विरोधी पक्षनेत्याची आणि वास्तव पाहण्याची अपेक्षा करतात, याला काय म्हणायचे??
राहुल गांधींना त्यांच्या रणनीतीकारांनी मोदींना पर्सनली टार्गेट करू नका असा सल्ला दिला. पण नेमका तोच सल्ला वगळून राहुल गांधींनी केंब्रिज पासून लंडनमध्ये ठिकठिकाणी मोदींनाच टार्गेट करणारी भाषणे केली ना…!! मग यात जबाबदार विरोधी पक्षनेता अथवा जे दत्तात्रय होसबळे यांनी अपेक्षित केले, ते वास्तव दिसले कोठे?? म्हणूनच वर उल्लेख केला आहे, की संघाने उच्चशिक्षित भाषेत वाचली गीता पण केंब्रिजचाच गोंधळ बरा होता!!, हेच राहुल गांधींच्या बाबतीत राजकीय वास्तव आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App