चार महिन्यांपूर्वीच तब्बल ११ हजार जणांची केली होती कपात
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : फेसबुकची मूळ कंपनी ‘मेटा’च्या कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. कारण, आता १० हजार कर्मचाऱ्यांनाकामावरून कमी करणार असल्याची माहिती मेटाने आज दिली आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आता दुसऱ्यांदा एवढी मोठी कर्मचारी कपात मेटा तर्फे करण्यात येत आहे. Facebook Meta will now fire 10 thousand employees
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या कर्मचार्यांना दिलेल्या संदेशात सांगितले की, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास १० हजारांनी कमी करणार आहोत आणि आम्ही अद्याप भरलेल्या नसलेल्या अंदाजे ५ हजार अतिरिक्त जागाही वगळणार आहोत, ज्यावर आम्ही अद्याप नियुक्ती केलेली नाही.
नव्या व जुन्या निवृत्तीवेतनाचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना
यापूर्वी अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे. कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्यांमध्ये गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनले तसेच Amazon.com आणि मायक्रोसॉफ्टसह अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून टेक कंपन्यांनी आतापर्यंत २,८०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. layoffs.fyi, ही वेबसाइट कर्मचारी कपातीचे निरीक्षण करते त्यानुसार, यावर्षी सुमारे ४० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App