‘Love Jihad’वरून नितेश राणे आणि अबु आझमी विधीमंडळाबाहेर आमनेसामने!

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यात लव्ह जिहादची तब्बल एक लाख प्रकरणं असल्याचे सांगितले आहे.

प्रतिनिधी

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून गंभीर बनत असलेला लव्ह जिहादच्या मुद्य्यावरून आज भाजपा आमदार नितेश राणे आणि समजावादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्यात आज विधीमंडळाबाहेर माध्यमांसमोरच शा‍ब्दिक खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, भाजपाने हा मुद्दा आक्रमकपणे मांडला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यात लव्ह जिहादची तब्बल एक लाख प्रकरणं असल्याचे सांगितले आहे. Argument between Nitesh Rane and Abu Azmi outside the legislature on Love Jihad

दरम्यान या मुद्य्यावरून आमदार नितेश राणे यांनी अबु आझमी यांना म्हटलं की, “मी तुम्हाला लव्ह जिहादची प्रकरणं दाखवतो, तुम्ही माझ्याबरोबर या. त्यानंतर तुम्हाला लव्ह जिहाद आहे हे मान्य करावं लागेल. तुम्ही मला तारीख आणि वेळ सांगा, मी तुम्हाला तुमच्या घरी येऊन घेऊन जाईल.” यावर आझमींनी लव्ह जिहाद असा कोणताही प्रकारच अस्तित्वात नसल्याचा दावा केला.


महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना हे न्यायालय पुन्हा बोलवू शकत नाही – सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे वकील हरीश साळवेंचा जोरदार युक्तीवाद


त्या अगोदर नितेश राणेंना अबु आझमी म्हणाले, “मुस्लिमांना इथं राहून देणार नाही, मशीद बंद करू, मुस्लिमांशी व्यवहार बंद करा, त्यांना भाड्याने घर देऊ नका, अशी विधानं रोज होत आहेत.” यावर नितेश राणेंनी ‘ग्रीन झोन’मधील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. यावर आझमींनी जर चुकीचं घडत असेल, बेकायदेशीर असेल तर ते बांधकाम पाडून टाकावं अशी भूमिका घेतली. त्यावर नितेश राणेंनी बांधकाम तोडताना लोक हत्यारं घेऊन येतात, असा आरोप केला. तर आझमींनी मुस्लिमांची संख्या केवळ ११ टक्के आहे, ते काय हत्यारं चालवणार असं म्हटलं.

Argument between Nitesh Rane and Abu Azmi outside the legislature on Love Jihad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात