विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. Setting up of a three member committee to study new and old pensions
सरकारी प्राथमिक शिक्षकांची संपातून माघार; जुन्या पेन्शनसाठी सरकारला मुदत देण्याची तयारी
समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. लेखा व कोषागारे संचालक हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. समिती तीन महिन्यात उपाययोजनेबाबतची शिफारस, अहवाल सादर करेल. याचबरोबर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप मागे घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले.
#LIVE | नव्या व जुन्या निवृत्तीवेतनाचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती – विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती https://t.co/WFBqsgXUzA — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 14, 2023
#LIVE | नव्या व जुन्या निवृत्तीवेतनाचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती – विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती https://t.co/WFBqsgXUzA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 14, 2023
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील शासकीय कार्यालये ओस पडली. दिवसभर शासकीय कार्यालयातील कामे ठप्प होती. संपाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत निवदेन केले. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
दरम्यान, जुन्या पेन्शन साठी संपावर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये पहिल्याच दिवशी फूट पडली आहे. सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेने संपातून माघार घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारला मदत देण्याची तयारी दाखवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेच्या बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात स्वतंत्र समिती नेमण्याची तयारी शिंदे – फडणवीस सरकारने दाखविली. सरकारच्या या शब्दावर विश्वास ठेवून संपातून माघार घेण्याचा निर्णय सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेने घेतला आणि जुनी पेन्शन स्कीम लागू करण्यासाठी विशिष्ट मुदत देण्याची तयारी दाखवली आहे मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भात ट्विट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App