नीरज चोप्रा, पी. टी. उषा, जीव मिल्खा सिंग आणि अंजू बॉबी जॉर्ज यांच्या प्रतिक्रियांमधले between the lines काय सांगते…??


दीर्घसूत्री धोरण आणि concentrated efforts यातूनच भारत क्रीडा क्षेत्रात अव्वल होऊ शकतो हे वर उल्लेख केलेल्या प्रत्येक खेळाडुच्या प्रतिक्रियेचे आणि मुलाखतीचे इंगित आहे. मोदी सरकारचे TOPS धोरण ही त्याची सुरुवात आहे. नीरज चोप्रा, पी. टी. उषा, जीव मिल्खा सिंग आणि अंजू बॉबी जॉर्ज यांच्या मुलाखतींमधले मधले हे खरे between the lines आहे…!!


भारतीय ऑलिम्पियन खेळाडूंनी टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर त्यांच्यावर संपूर्ण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होणे स्वाभाविक आहे. तसा तो झालाही आहे.पण या सर्व गोष्टींमध्ये दस्तुरखुद्द ऑलिम्पियन सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, भारताची सुपरस्टार धावपटू पी. टी. उषा, गोल्फर जीव मिल्खा सिंग आणि ॲथलिट अंजू बॉबी जॉर्ज यांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात, त्यातून भारताच्या एकूण क्रीडाविषयक धोरणाचा आणि दृष्टिकोनाचा “लख्ख आरसा”च डोळ्यासमोर आणून उभा केला आहे.Neeraj Chopra, P. T. Usha, Jeev Milkha Singh and Anju Bobooy George interview’s between the lines

एक प्रकारे या सर्व खेळाडूंच्या प्रतिक्रिया आपणा सर्व भारतीयांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्याच वाटतात.सर्वप्रथम नीरज चोप्राची प्रतिक्रिया पाहू… नीरज चोप्रा म्हणतो, की मी क्रीडा क्षेत्रात जाईन. काही मोठी कामगिरी करेन, हे माझ्या स्वप्नातही नव्हते. मी सहज स्टेडियममध्ये गेलो आणि तिथे खेळ पाहत होतो. तेव्हा एक आवड म्हणून मी खेळायला सुरुवात केली. माझ्या घरची परिस्थिती नव्हती. दीड लाख रुपयांचा भाला आणायला पैसे नव्हते. पण ईश्वराच्या कृपेने आणि सरकारच्या प्रोत्साहनाने मी खेळत राहिलो आणि आजचे हे यश मला मिळू शकले.नीरजची ही प्रतिक्रिया भारतीयांचा एकूण क्रीडा प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन सांगते. याचा सरळ अर्थ असा आहे की व्यक्तींमध्ये “स्पोर्टिंग करिअर”ची दृष्टीच विकसित होऊ दिली गेलेली नाही. ज्यांची दृष्टी विकसित झाली, त्यांना योग्य सुविधा दिल्या गेल्या नाहीत. नीरजने आपल्या यशाचे श्रेय सर्व भारतीयांना जरूर दिले आहे, पण ही भारतीयांची “खोबरं तिथं चांगभलं” ही वृत्ती सांगते. सुवर्णपदक मिळवल्यानंतर नीरजचे सोशल मीडियावर फॉलोइंग वाढले आहेत. त्याआधी तो फारसा कुणाला माहिती नव्हता. ही टोचणारी असली तरी वस्तुस्थिती आहे.

पी. टी. उषा यांनी तर डोळ्यात पाणी आणून आपले स्वप्न साकार झाल्याचे म्हटले आहे. पी. टी. उषा प्रचंड क्षमतेच्या धावपटू होत्या. परंतु त्या काळात त्यांना मिळालेल्या सुविधा अपूर्ण होत्या हेच त्यांच्या डोळ्यातले अश्रू सांगतात. त्या भारताच्या सुवर्ण कन्या होत्या पण आशियाई स्पर्धेतल्या…!! ऑलिम्पिक मेडल फक्त 0.01 सेकंदने हुकले ते त्यांच्या जिव्हारी लागलेय. ही खंत वर्षानुवर्षे त्यांना उराशी बाळगावी लागली आहे. हेच त्यांच्या डोळ्यातल्या अश्रुंनी समस्त भारतीयांना सांगितले आहे.

जीव मिल्खा सिंग या गोल्फरची प्रतिक्रियाही फारशी वेगळी नाही. ते म्हणतात, की माझे वडील भारताचे सुपरस्टार धावपटू मिल्खा सिंग हे स्वर्गात अश्रू ढाळत असतील. हे बोलताना माझ्याही डोळ्यात अश्रू आहेत. ऑलिम्पिक सुवर्णपदक हे मिल्खासिंग यांचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण ते पूर्ण करू शकले नाहीत. नीरजने हे स्वप्न पूर्ण केले आहे, असे जीव मिलखा सिंह म्हणाले. यातूनही जीव मिल्खा सिंग यांनी तीच खंत व्यक्त केली आहे जी पी. टी. उषा यांनी व्यक्त केलीय.

मिल्खा सिंग भारताचे सुपरस्टार धावपटू पण त्यांना मिळालेल्या सुविधा कोणत्या दर्जाच्या होत्या??, पायात बुट नसताना त्यांनी केलेली कामगिरी किती अव्वल दर्जाची होती!! त्यांनाही पंतप्रधान नेहरूंनी प्रोत्साहन दिले. पण सुविधांचे काय??, क्रीडा साहित्याचे काय??, हे प्रश्नच एक प्रकारे जीव मिलखा सिंह यांनी अप्रत्यक्षपणे भारतीयांसमोर उभे केले आहेत.

अंजू बॉबी जॉर्ज हिने तर उघडपणे भारताच्या दोन सरकारांमधील भेद सांगितला आहे. तिचे भाष्य सर्वात मर्मभेदी आहे. यश मिळाले की अभिनंदनाचा फोन करायचा इतपतच आपल्या राजकीय नेत्यांचा क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता, हे तिने अधोरेखित केले आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने ब्राँझ मेडल जिंकल्यावर तिला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी फोन केला होता. अभिनंदन केले होते. बस एवढेच…!!, त्यानंतर काही नाही हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

याचा अर्थ तिच्याही क्रीडा सुविधा, क्रीडा कौशल्य याकडे सरकारी पातळीवर कसे दुर्लक्ष झाले होते हेच तिने एक प्रकारे अधोरेखित केले आहे. मोदी सरकारवर तिने स्तुतिसुमने उधळली हे खरे परंतु तीही मर्यादित स्वरूपात. जर मोदी सरकार काही target oriented करत असेल, ऑलिंपियन घडवण्यासाठी TOPS : Target Olympic podium Scheme
पॉलिसी आणत असेल तर कोणताही खेळाडू असाच तयार होईल आणि नीरज चोप्रासारखा तो सुवर्णपदकाला गवसणी घालेल हे सांगायला तिने कमी केलेले नाही.

तिच्या मुलाखतीत मला एक महत्त्वाचा भाग म्हणजे 2024 आणि 2028 च्या ऑलिम्पिकची भारताची तयारी. ऑलिंपिक खेळांसाठी तयारी करताना दीर्घकालीन धोरणाच आखावे लागते, हे तिने आवर्जून सांगितले आहे.

यातच सध्याच्या क्रीडा धोरणाची “मेख” आहे. नुसती स्टेडियम बांधून, क्रीडा साहित्य खरेदी करून किंवा विविध संघटनांवर आपले वर्चस्व मिळवून कोणतेही राजकीय नेते भारताला ऑलिंपिकमध्ये पदके मिळवून देऊ शकलेले नाहीत, हे अप्रत्यक्षपणे तिने सुचित करून भारतीयांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

दीर्घसूत्री धोरण आणि concentrated efforts यातूनच भारत क्रीडा क्षेत्रात अव्वल होऊ शकतो हे वर उल्लेख केलेल्या प्रत्येक खेळाडुच्या प्रतिक्रियेचे आणि मुलाखतीचे इंगित आहे. मोदी सरकारचे TOPS धोरण ही त्याची सुरुवात आहे. नीरज चोप्रा, पी. टी. उषा, जीव मिल्खा सिंग आणि अंजू बॉबी जॉर्ज यांच्या मुलाखतींमधले मधले हे खरे between the lines आहे…!!

Neeraj Chopra, P. T. Usha, Jeev Milkha Singh and Anju Bobooy George interview’s between the lines

महत्तवाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण