FIH Ranking : Tokyo Olympic मधील ऐतिहासिक कामगिरीचं फळ ! भारतीय पुरुष हॉकी संघ तिसऱ्या स्थानावर तर महिला संघाची आठव्या स्थानावर उडी


दुसरीकडे महिला हॉकी संघानेही आठव्या स्थानावर उडी मारली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय हॉकी संघाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. तब्बल ४१ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघाच्या FIH Ranking मध्ये सुधारणा झालेली असून पुरुष हॉकी संघाने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. FIH Ranking: Fruit of historic performance at Tokyo Olympics! The Indian men’s hockey team jumped to third place while the women’s team jumped to eighth place

जागतिक क्रमवारीत सध्या पुरुषांमध्ये बेल्जिअम पहिल्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर तर भारतीय हॉकी संघ तिसऱ्या स्थानावर आहे. याआधी FIH Ranking मध्ये मनप्रीत सिंगचा भारतीय हॉकी संघ चौथ्या स्थानावर होता.



मार्च २०२० मध्ये FIH Pro Hockey League मधल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने हे स्थान मिळवलं होतं. यानंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करत भारताने आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा केली आहे.

उपांत्य फेरीत बेल्जिअमविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारताने कांस्यपदकाच्या सामन्यात जर्मनीवर ५-४ ने मात केली होती.

याआधी जागतिक क्रमवारीत महिला संघ नवव्या स्थानी होता. २०१८ साली लंडनमध्ये पार पडलेल्या महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचल्या होत्या. यानंतर २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही भारतीय महिलांनी रौप्यपदक मिळवलं होतं. या कामगिरीच्या जोरावर त्यांना क्रमवारीत नववं स्थान मिळवलं होतं.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठीच्या सामन्यापर्यंत धडक मारल्यानंतर महिलांच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून त्या आठव्या स्थानावर आल्या आहेत.

FIH Ranking: Fruit of historic performance at Tokyo Olympics! The Indian men’s hockey team jumped to third place while the women’s team jumped to eighth place

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात