ममता बॅनर्जी केंद्राविरोधात आक्रस्ताळ्या उड्या मारत राहणार…?? की उद्धव ठाकरे यांची “वाट” पकडणार…??


… तेव्हा बघू या ममता बॅनर्जी आपल्या आक्रस्ताळ्या स्वभावाप्रमाणे पंतप्रधान मोदींना आव्हान देतच राहतात की स्वत:चा “उद्धव ठाकरे” करून त्यांच्यापुढे पोटनिवडणूक घेण्यापुरती का होईना पण राजकीय शरणागती पत्करतात…?? “निर्णय” ममतांना घ्यायचाय… पण “निकाल” मोदींच्या हातात आहे…!!


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव करत राज्यात प्रचंड बहुमताने निवडून येऊन देखील तीनच महिन्यात प्रचंड desperate  झाल्या आहेत. त्यांना आता आपल्या मुख्यमंत्रीपदाची चिंता लागून राहिली आहे. एकीकडे त्या “दिल्लीवर स्वारी” करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मोठे आव्हान निर्माण करण्याची भाषा बोलून जोरदार तयारी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी राणा भीमदेवी थाट आणून विरोधी ऐक्याचा हुंकार भरला आहे. पण दुसरीकडे मात्र त्या प्रचंड धास्तावलेल्या दिसत आहेत. Mamata Banerjee has to bow before PM Narendra Modi for holding byelections in West Bengal

आता येत्या तीन महिन्यात त्यांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीत द्वारे विधानसभेत पोहोचण्यावाचून गत्यंतर उरलेले नाही. विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याची त्यांची तयारी देखील झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदाराचा त्यांनी आपल्या परंपरागत भवानीपूर मतदारसंघातून राजीनामा देखील घेतला आहे.

परंतु आता घोडे अडले आहे ते निवडणूक आयोगापाशी. आपल्या राजकीय हट्टाचा
कसा दुष्परिणाम होतो हे त्यांना आता जाणवू लागले आहे. मूळात त्यांनी राजकीय भावनेच्या भरीस पडून आपला पारंपरिक मतदारसंघ भवानीपूर सोडून सुवेंदू अधिकाऱ्यांच्या नंदिग्राममध्ये जाण्याची गरज नव्हती. पण त्या तिथे गेल्या त्यांनी सुवेंदू अधिकाऱ्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान जरूर दिले, याचा फायदा त्यांना कदाचित संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये इतरत्र मिळालाही असेल. पण त्या सुवेंदू अधिकारी यांच्यासमोर हरल्या आणि इथेच त्यांच्या राजकीय अपयशाची “मेख” आहे.

आता पोटनिवडणूक घेण्याकरता निवडणूक आयोगाला निवेदने देण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. यासाठी त्यांनी आपल्याच आधीच्या भूमिकेविरोधात भूमिका देखील घेऊन टाकली आहे.



पश्चिम बंगालमधल्या कोरोनाच्या मुद्द्यावरून त्या केंद्र सरकारला सारखे कोसत होत्या. पत्रावर पत्रे पाठवून केंद्राकडून जादा कोरोना प्रतिबंधक लसींचे जादा डोस मागवत होत्या. पण आता आपली तीच पत्रे आणि आपले तेच म्हणणे मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ही वेळ त्यांच्यावर केंद्र सरकारने किंवा निवडणूक आयोगाने आणलेली नाही. निवडणूक आयोगाचा निर्णय साधा आणि देशव्यापी आहे. कोरोनाची लाट पूर्ण आटोक्यात आल्याशिवाय कोणतीच निवडणूक घ्यायची नाही हा तो निर्णय आहे. आता त्यात ममता बॅनर्जी अडकल्या आहेत.
त्यांचे मुख्यमंत्रीपद अडकले आहे. यात निवडणूक आयोगाचा काय दोष…?? किंवा केंद्र सरकारचा तरी काय दोष…??

पण आता ममतांनी स्वत:च करून ठेवलेली स्वतःची ही अडचण पुरती जाणली आहे. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला सौम्य शब्दात म्हणजे त्यांच्या आक्रस्ताळ्या स्वभावाच्या विपरीत जाऊन आवाहने करायला सुरुवात केली आहे. बंगाल विधानसभा निवडणुकीत त्या दररोज सकाळ-संध्याकाळ निवडणूक आयोगाच्या नावाने खडे फोडत होते होत्या. आता त्याच निवडणूक आयोगाला पोट निवडणूक घेण्याची त्या आवाहने करीत आहेत.

पण अजून पोटनिवडणुकीचे घोडामैदान बरेच लांब आहे. निर्णय घेण्यासही अजून अवकाश आहे. दरम्यानच्या काळात हुगळी तून मेघनेतून बरेच “राजकीय पाणी” वाहून जायचे आहे आणि अखेरीस ममता बॅनर्जी यांचा “उद्धव ठाकरे” व्हायचा आहे…!!

उद्धव ठाकरे यांनी नाही का अशाच राणा भीमदेवी थाटात घोषणा केल्या होत्या… भाजपशी दोन हात करण्याच्या वल्गना केल्या होत्या… पण शेवटी स्वतःचे मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी विधान परिषदेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करावी लागली. त्यासाठी महाविकास आघाडीचा एक जादा आमदार निवडून येण्याची शक्यता असताना देखील माघार घ्यावी लागली. भाजपला विधानपरिषदेवर एक जादा आमदार बिनविरोध निवडून आणण्याची संधी द्यावी लागली. तेव्हा कुठे “राजकीय तडजोड” होऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधान परिषदेतून बिनविरोध निवडून येऊन दाखल होऊ शकले.

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला नसता तर उद्धव ठाकरे विधिमंडळात बिनविरोध निवडून येऊ शकले नसते. किंबहुना निवडणूक झाली नसती तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यावाचून पर्याय राहिला नसता. 2019 मध्ये “उद्धव ठाकरे” होते, 2021 मध्ये ममता बॅनर्जींचा नंबर आहे. त्यांना पोटनिवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जावेच लागेल, अशी बंगाल मधली आणि देशांमधली राजकीय स्थिती आहे…!!

… तेव्हा बघू या ममता बॅनर्जी आपल्या आक्रस्ताळ्या स्वभावाप्रमाणे पंतप्रधान मोदींना आव्हान देतच राहतात की स्वत:चा “उद्धव ठाकरे” करून त्यांच्यापुढे पोटनिवडणूक घेण्यापुरती का होईना पण राजकीय शरणागती पत्करतात…?? “निर्णय” ममतांना घ्यायचाय… पण “निकाल” मोदींच्या हातात आहे…!!

Mamata Banerjee has to bow before PM Narendra Modi for holding byelections in West Bengal

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात