Mamata Banerjee for UPA Leadership : यूपीएमध्ये अद्याप नसतानाही ममतांचे राजकीय वजन वाढले; पवारांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर ममता बॅनर्जी यांचे दिल्लीतले राजकीय वजन कमालीचे वाढले आहे. त्यांची तृणमूळ काँग्रेस सध्या संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएची घटक पक्ष नाही तरी देखील यूपीएमध्ये ममतांचे राजकीय वजन काँग्रेसच्या बरोबरीने येऊन ठेपले आहे. त्यांच्याकडे यूपीएचे चेअरमनपद किंवा अत्यंत महत्त्वाचे असे यूपीएचे समन्वयक पद येऊ शकते, असे ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांचे मत आहे. Mamata Banerjee for UPA Leadership; gandhi family in favour of Mamata than sharad pawar

  • पश्चिम बंगालसह पाचही राज्यांच्या निवडणूकीतील निकालानंतर कोरोनाच्या भाषेत बोलायचे झाल्यास काँग्रेसचा मोठा political immunity lost झालेला आहे. या पार्श्वभूमीवर ममतांची राजकीय ताकद वाढली आहे. काँग्रेसच्या गांधी नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या जी – २३ नेत्यांचा वर्ग ज्या विजयी नेत्याच्या प्रतिक्षेत होता, त्यांना काँग्रेसच्या कुळातील किंवा गोत्रातील नवा नेता ममता बॅनर्जींच्या रूपाने मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे यूपीएमधले महत्त्वाचे पद येऊ शकते.
  • पण या सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या यूपीए चेअरमनशीप मिळविण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले असल्याचे रशीद किडवई यांचे म्हणणे आहे. एकतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद आणि संख्याबळ ममतांच्या तृणमूळ काँग्रेसच्या तुलनेत फारच किरकोळ आहे.
  • शिवाय गांधी परिवार आणि ममता यांचे संबंध तसेच गांधी परिवार आणि पवार यांचे संबंध यांची राजकीय गुणात्मक पातळीवर तुलना करता, ममतांचे संबंध कितीतरी चांगले आहेत. त्यांची विश्वासार्हता दिल्लीच्या आणि बंगालच्या राजकारणात अधिक आहे.
  • शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर गांधी परिवार आणि अन्य काँग्रेस नेते यांना सातत्याने अनुभवसिध्द संशय राहिलेला आहे. त्यामुळे दिल्लीत यूपीएमधील महत्त्वाच्या पदांसाठी पवारांचे नाव चर्चेतही नाही, असे रशीद किडवई यांचे म्हणणे आहे.
  • यूपीए चेअरमन पदासाठी शरद पवारांचे नाव शिवसेनेचे खासदार संजय राऊत सामनातून चालवत असतात. मराठी माध्यमांमध्ये त्याची चर्चा होते. दिल्लीत पवारांच्या नावाची चर्चाही होत नाही.
  • पण बंगालमधील ममता बॅनर्जींच्या अभूतपूर्व विजयानंतर त्यांचे नाव यूपीएतील महत्त्वाच्या पदासाठी आघाडीवर आले आहे. यासाठी पडद्यामागे घडामोडी सुरू झाल्या आहेत. टेलिफोनवर चर्चा सुरू आहेत. डिसेंबर २०२० मध्ये ज्या राजकीय दूताने जी – २३ गटातील नेत्यांना सोनिया गांधींच्या घरी आणले होते, तोच राजकीय दूत आता यूपीएच्या नेतृत्वासाठी ममता बॅनर्जींची मनधरणी करण्यासाठी सक्रियपणे काम करत असल्याचे सांगितले जात आहे. संजय गांधींच्या काळात याच राजकीय दूताने ममता बॅनर्जी यांना भारतीय युवक काँग्रेसमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे समजते.
  • यूपीए संबंधीचे हे नियोजन बहुपेडी आहे. त्यातून काँग्रेसचे राजकीय नेतृत्व गांधी परिवाराकडेच राहील. अधिक स्पष्ट शब्दांमध्ये सांगायचे झाले, तर यूपीएचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ममतांना आमंत्रण देण्यासाठी 10,जनपथ कडून पुढाकार घेतला जात आहे, अशी रशीद किडवई यांची माहिती आहे.

Mamata Banerjee for UPA Leadership; gandhi family in favour of Mamata than sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात