विशेष प्रतिनिधी
मुंबई : मसण्या उद हा प्राणी मृतदेहाच्या मांसावर जगतो. तसे शिवसेनेचे धोरण आहे, अशी खरमरीत टीका भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, संजय पांडेय यांनी केली आहे. कोळीवाडा येथील कांदेवाडी हिंदू स्मशानभूमी मधील लहान मुलांच्या हिंदू स्मशानभूमीचा व्यावसायिकरित्या वापर केला जात आहे. त्या मुद्यावर ते बोलत होते.Shiv Sena’s policy is like an animal living on a dead body
मुंबई महानगरपालिकेने स्मशानभूमीतील बेकायदेशीर शेड्स व बांधकाम यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ह्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे मी पत्राद्वारे लेखी तक्रार केली होती.
परंतु ,कोणतीही कारवाई झाली नाही. याचाच अर्थ मसण्या उद प्राणी जसा मृतदेहाच्या मांसावर जगतो तसे शिवसेनेचं हिंदुत्वाचे धोरण आहे. सदर प्रकारणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि १२ दिवसांत हे बेकायदेशीर कचरा विलगीकरण प्लांट हटविण्यात यावेत. अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
https://youtu.be/bFM2_WwFSi0
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App