खाकीची शपथ : गृहमंत्री अनिल देशमुख यांना पोलीस प्रबोधिनी दीक्षांत सोहळ्यापासून ठेवले दूर

एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यालाशंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्याच्या आरोपावरून गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. त्यामुळेच गृह विभागाचा महत्वाचा कार्यक्रम असलेल्या पोलीस दीक्षांत सोहळ्यापासून त्यांना दूर ठेवण्यात आले. State government distanced Anil Deshmukh from Police academy program


विशेष प्रतिनिधी

नाशिक : एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यालाशंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्याच्या आरोपावरून गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. त्यामुळेच गृह विभागाचा महत्वाचा कार्यक्रम असलेल्या पोलीस दीक्षांत सोहळ्यापासून त्यांना दूर ठेवण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या 118व्या तुकडीतील 668 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी राष्ट्रध्वजासमोर मंगळवारी ‘खाकी’ची शपथ घेत निःपक्षपातीपणे देशाच्या संविधानाचा सदैव मान राखत जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमात गृहमंत्री असूनही अनिल देशमुख यांना बोलावण्यात आले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमास उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री अजित पवार ऑनलाइन सहभागी झाले होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला आहे. मुंबईतील बार वाल्यांकडून दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट देशमुख यांनी सचिन वाझेला दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. विरोधी पक्षाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. देशमुख यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर देशमुख यांना पोलीस दीक्षांत सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आले.याप्रसंगी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे म्हणाले, जेव्हा खडतर प्रशिक्षण पूर्ण करत आपण एखादी गोष्ट कमावतो. त्याचा आनंद नक्कीच मोठा असतो. गेल्यावर्षी या सोहळ्याची रंगत अन दिमाखदार संचलन प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या दिवसाच्या आठवणी आज पुन्हा ताज्या होत आहेत.

शिस्त आणि देखणेपणाचा अनोखा संगम या समारंभात पहावयास मिळतो. आपल्या रूपाने या राज्याला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मिळाले आहेत. सध्या पुन्हा हा महाराष्ट्र कोरोनाच्या न दिसणाऱ्या विषानुरूपी शत्रुसोबत लढा देत आहे. हे आव्हान राज्याच्या पोलीस दलाने मागील वर्षापासून स्वीकारले आहे. समाजासाठी, लोकांसाठी ते कोरोनाकाळातही स्वतःची व कुटुंबियांच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. आपनदेखील आता आजपासून या अद्भुत अशा पोलीस दलाचा एक घटक झाला आहात आणि या दलाची गौरवशाली परंपरा आपणही निष्कलंकपणे पुढे चालवाल.

उपस्थित पोलीस अधिकारी यांनी तिरंगा ध्वजाला सलामी दिली. पोलीस उप निरिक्षक शुभांगी शिरगावे यांनी परेड कमांडर म्हणून तुकडीचे नेतृत्व केले.

State government distanced Anil Deshmukh from Police academy program

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*