प्रतिनिधी
नवी दिल्ली – शिवसेना आणि नारायण राणे यांचा वाद सर्वश्रूत असला, तरी शिवसेनेचे नेते आणि नारायण राणे हे कधी मधी एका व्यासपीठावर एकत्र दिसतात. एखाद्या कार्यक्रमात एकत्रही येतात. विकास कामे असतील, तर एकमेकांशी स्पर्धेबरोबर संपर्कही साधतात.Narayan Rane’s letter to the Chief Minister
असाच एक संपर्क नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची बातमी आहे. राणे यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका पुरवण्याची मागणी केली आहे.
रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हा परिषदांनी रुग्णवाहिका खरेदी केलेल्या आहेत. मात्र सिंधुदुर्गचा प्रस्ताव उपरोक्त कार्यालयाकडे अद्यापी प्रलंबित आहे. या संदर्भात जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी आपल्या विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती असे राणेंनी पत्रात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने 13 व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेला अखर्चित निधी तसेच 14 वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या व्याजाची रक्कम रुपये 89 लाख 91 हजार 951 रुपये इतकी रक्कम शासन आदेशान्वये राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे यांचे खात्यामध्ये वर्ग केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेची गरज पाहता व सद्यस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील 38 प्राथमिक केंद्राना रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे.
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका निर्लेखित झालेल्या असल्याने आरोग्य सुविधा व सेवा बळकटीकरणासाठी अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचेकडे उपरोक्त रक्कमेतून सहा रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी द्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App