पश्चिम बंगालची पोटनिवडणूक : ममता बॅनर्जी जिंकल्या तरच मुख्यमंत्रीपदी राहणार, भवितव्य मतदान यंत्रात बंद, रविवारी निकाल जाहीर; अख्ख्या देशाचे लक्ष


वृत्तसंस्था

कोलकाता : अख्ख्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल येथील विधानसभेच्या भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. रविवारी (ता. 3 ऑक्टोबरला) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. West Bengal by-election: Chief Minister Mamata Banerjee’s future locked in voting machine, results announced on Sunday; The attention of the whole country

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपुरची निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे. कारण त्या जिंकल्या तरच मुख्यमंत्री पदावर राहू शकतात. सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून तृणमूल काँग्रेसने बहुमत प्राप्त केले. परंतु ‘गड आला पण, सिंह गेला.’ या प्रमाणे ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राम मतदारसंघात दारुण पराभव झाला होता. त्यांना भाजपचे नेते शुभेन्दू अधिकारी यांनी पराभूत केले होते.

विधानसभेत पुन्हा निवडून जाण्यासाठी बॅनर्जी यांना पोटनिवडणूक लढवावी लागली आहे. विशेष म्हणजे भवानीपुर हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी या मतदार संघाचा त्याग केला. आक्रस्ताळी भूमिका घेऊन नंदीग्राममधून पूर्वाश्रमीचे तृणमूलचे आमदार आणि नंतर भाजपचे नेते बनलेल्या शुभेन्दू अधिकारी यांना आव्हान दिले. असे करताना त्यांनी भवानीपुर हा मतदार संघ सोडला होता. एकाच वेळी भवानीपूर आणि नंदीग्राममधून त्यांनी निवडणूक लढवली असती तर त्या कदाचित भवानीपुर येथून विजयी झाल्या असत्या आणि पुन्हा पोटनिवडणुकीचा प्रश्न निर्माण झाला नसता.भाजप नेत्याच्या गाडीवर हल्ला

भवानीपुर या हाई-प्रोफाइल जागेबरोबरच जंगीपुर आणि समसेरगंज येथे पोटनिवडणूक होत आहे. काही तुरळक घटना पाहता एकंदर मतदान शांततेत पार पडले.त्या बरोबर ममता बनर्जी यांचे भवितव्यही मतदान यंत्रात बंद झाले. या तिन्ही पोटनिवडणुकीचे निकाल ३ ऑक्टोबरला जाहीर होतील. परंतु दिवसभर ममता लढवत आलेल्या भवानीपुरचीच चर्चा होती. आरोप- प्रत्यारोप सुरु होते. सायंकाळी भाजपचे नेते कल्याण चौबे यांच्या गाडीवर भवानीपुर येथे हल्ला झाल्याने वातावरण तंग बनले.

जिंकल्या तरच मुख्यमंत्रीपदी राहणार

भवानीपुर मतदार संघात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपने प्रियंका टिबरेवाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. ही निवडणूक जिंकणे ममतांसाठी खूपच महत्वाचे आहे. त्या जिंकल्या तरच विधानसभेत पोचणार आणि मुख्यमंत्रीपदी राहणार आहेत. हरल्या तर तृणमूल काँग्रेसला नवा नेता मुख्यमंत्रीपदासाठी निवडावा लागेल. यापूर्वी ममता बॅनर्जी या नंदीग्रामची निवडणूक हरल्या होत्या. हा अनुभव गाठीशी असताना त्या पुन्हा रिंगणात उतरल्या आहेत. त्या विजयी होतात का पराजित याचा निर्णय रविवारी ३ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

ममता बॅनर्जींचे मतदान, पण मीडियाशी मौन

ममता बॅनर्जी यांनी आज दुपारी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी दुपारी ३.१० वाजता मित्रा इन्स्टिट्यूट येथील मतदान केंद्रावर पोचून मतदान केले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी मौन पाळले, चकार शब्द काढला नाही. सर्वासमोर हात जोडले आणि मतदानासाठी आत गेल्या आणि मतदान करून गाजावाजा न करता निघून सुद्धा गेल्या.

भवानीपुरमध्ये सर्वात कमी मतदान

निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार भवानीपुरमध्ये सर्वाधिक कमी मतदान झाले आहे. सायंकाळी पाच वाजे पर्यंत ५३.३२ टक्के मतदान झाले आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपुरमध्ये ७६.१२ तर समसेरगंजमध्ये ७८.६० टक्के मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजता कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले. भाजप- तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी झक्काझक्की झाली. तीन पोटनिवडणुकीच्या मतदार संघात ७२ सुरक्षा तुकड्या तैनात केल्या आहेत. त्यामध्ये ३५ तुकड्या एकट्या भवानीपुरमध्ये आहेत. मतदान केंद्राबाहेरच्या २०० मीटर क्षेत्रात १४४ कलम लावण्यात आले आहे.

West Bengal by-election: Chief Minister Mamata Banerjee’s future locked in voting machine, results announced on Sunday; The attention of the whole country

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*