नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात पुणे पोलिसांची लुकआऊट नोटीस ; कर्जफेड केली नसल्याने बजावली

वृत्तसंस्था

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड दोघांनी केली नाही, असा ठपका ठेवण्यात आला. तसेच कोर्टाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. Pune police issued lookout notice against Narayan Rane’s wife and son for not repaying the loan

आर्टलाईन प्राॉपर्टीड प्रायव्हेट लिमिटेडनं २५ कोटींचे कर्ज घेतले होते. नीलम राणे आर्टलाईन प्राॉपर्टीज कंपनीच्या सहअर्जदार आहेत. या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे लुकआऊट सर्क्युलर जारी केले आहे.दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएचएफएल) कंपनीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले,  या संदर्भात केंद्र सरकारकडून एक पत्र गृह विभागाला प्राप्त झाले होते. ते आम्ही पुणे पोलिसांना दिले आणि त्यानुसार लुकआऊट सर्क्युलर दिले आहे.

सुडाचे राजकारण सुरूच : अतुल भातखळकर

भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले, मला या बाबत काही माहिती आली नाही. पण जर नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरुद्ध लूकआऊट नोटिस दिली असेल तर हे केवळ राजकीय सूडबुद्धीने राज्य सरकार कारवाई करत आहे. नारायण राणेंना ज्या बेकायदा अटक केली होती. त्याचेच हे राज्य सरकारचे पुढील पाऊल आहे.

Pune police issued lookout notice against Narayan Rane’s wife and son for not repaying the loan

महत्त्वाच्या बातम्या