नाशिक : महाराष्ट्रातल्या मुंबई वगळून इतर महापालिकांसाठी “तीन वॉर्ड – एक प्रभाग” या रचनेचा निर्णय महाविकास आघाडीच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतला आहे ना… मग अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील अशी फट त्यामध्ये का ठेवण्यात आली आहे??, असा सवाल उपस्थित होतो आहे. Why final decision remain pending on municipal ward system?? What the politics is behind it??
यामध्ये अर्थातच राजकारण आहे, हे उघड आहे. कारण संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीत “तीन वॉर्ड – एक प्रभाग” अशी रचना करण्याचा निर्णय घेताना ठाण्याचे पालकमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि नांदेडचे पालकमंत्री काँग्रेसचे अशोक चव्हाण यांचा उद्धव ठाकरे मंत्रिमंडळावर प्रभाव पडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना आपल्या आधीच्या निर्णयापासून माघार घ्यावी लागल्याचेही सांगितले जात आहे.
कारण पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांवर अजित पवारांचे एक हाती वर्चस्व होते. ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मोडून काढण्यात आले. फडणवीस सरकारने 2017 मध्ये “चार वॉर्ड एक प्रभाग” अशी रचना करून महापालिकेच्या निवडणुका घेतल्या होत्या. त्यामध्ये पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि मुंबईतही भाजपने घवघवीत यश मिळवले होते. मुंबई वगळता इतर महापालिकांवर भाजपची एकहाती सत्ता आली. पुणे पिंपरी-चिंचवड मध्ये आणि नाशिक मध्ये देखील राष्ट्रवादीची जबरदस्त पिछेहाट झाली होती.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सरकार बनवल्या बरोबर लगेच महापालिकांची रचना बदलून सिंगल वॉर्ड रचना स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पण आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण यांच्या प्रभावामुळे तो फिरवण्यात आला, असे सांगण्यात आले. त्यामुळेच कदाचित अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, असे कलम सगळ्यात शेवटी त्याला जोडण्यात आले असावे.
मुंबईबाबत सिंगल वॉर्ड रचना कायम आहे. शिवसेनेसाठी ती अनुकूल स्थिती आहे. भाजप सुद्धा मुंबईमध्ये तितकाच प्रबळ आहे. राष्ट्रवादी चौथ्या नंबरवर आहे. पण राष्ट्रवादीच्या सत्तेच्या पोपटाचा प्राण पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये आहे. त्यामुळे निदान तेथे तरी आपल्या मनासारखा निर्णय व्हावा, अशी अजित पवार यांची अपेक्षा असल्यास त्यावर एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी पाणी फिरवले काय? आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी मुख्य संमती दिली काय?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
तरी देखील संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील असे कलम टाकून जी फट ठेवण्यात आली आहे, त्याचे गौडबंगाल लवकरच उलगडेल अशी अपेक्षा आहे. तेथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात?, यावर अजितदादांचा प्रभाव चालतो की उद्धव ठाकरे आपला “व्हेटो” वापरणार हेही स्पष्ट होणार आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App