पाटणा : छत्तीसगड विधानसभेत नमाज पढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यानंतर बिहार विधानसभेत मारुती स्तोत्र म्हणण्यासाठी वेगळ्या खोलीची सोय करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. याबाबतचे निवेदन भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर बचोल यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले. Give a separate room in the assembly to sing Maruti Stotra, demand of BJP MLA
सर्व धर्मांचा सन्मान व्हावा, यासाठी मारुती स्तोत्र म्हणण्यासाठी हिंदू आमदारांनी एक खोली देण्याचा मागणी केल्याचे बचोल यांनी सांगितले. झारखंड विधानसभेच्या परिसरात नमाज पढण्यासाठी एका खोलीची सोय केली होती. त्यानंतर मारुती स्तोत्र म्हणण्यासाठी हिंदू आमदारांना वेगळी खोली देण्याची मागणी तेथील भाजपच्यावतीने करण्यात आली. त्याचे पडसाद बिहारमध्येही उमटले आहेत.
विधानसभा सचिवालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम आमदारांना नमाजासाठी विधानसभा परिसरात १९९३मध्ये एक खोली दिली होती. त्यावेळी बिहारमध्ये लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते आणि झारखंड बिहारचा भाग होता. मात्र हिंदू आमदारांनी तशी कोणतीही मागणी केली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App