मुलापेक्षा बापाचं ठरतोय वरचढ, छत्तीसगढ मुख्यमंत्र्यांच्या वडिलांची वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेसची वाढली डोकेदुखी


वृत्तसंस्था

रायपूर : छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राम्हणाविरुद्ध अपशब्द वापरल्या प्रकरणी अटक झाली आहे. पण, यापूर्वी सुद्धा त्यांनी वादग्रस्त विधाने करणे आणि हिंदू धर्मातील रूढी परंपरा यांना छेद देणारे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुलगा बापाच्या नावाने ओळखला जावा, अशी मोठी कामगिरी त्यांनी वेळोवेळी केली आहे.  Controversial statements of Chhattisgarh Chief Minister’s father; Increased headaches for Congress

छत्तीसगढमध्ये काँग्रेसची राजवट आहे. भुपेश बघेल मुख्यमंत्री आहेत. परंतु कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नंदकुमार बघेल हे गावपुढारी म्हणून हा उद्योग करून काँग्रेस आणि स्वतःच्या मुलाला अनेकदा अडचणीत आणले आहे.

नंदकुमार बघेल यांचे उद्योग

  •  दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा असताना नंदकुमार बघेल हे रावणपूजनाचा कार्यक्रम घेत आले आहेत.
  •  दसऱ्याला रावणाची पूजा करण्याची प्रथा त्यांनी छत्तीसगढमध्ये सुरु केली
  •  छत्तीसगडमधील १२४ गावात रावणदहनाचे कार्यक्रम न करण्याचा संकल्प त्यांनी सोडला
  •  रावणाचा पुत्र मेघनाद , महिषासुर यांना हुतात्मा घोषित केले.
  •  राजनांदगाव जिल्ह्यात रावण, महिषासुर, होलिका आणि बळीला पूर्वज म्हणून त्यांची पाच हजार
    दिवसींच्या उपस्थितीत पूजा केली गेली
  •  मत आमचे, राज्य तुमचे असे चालणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी यापूर्वी उच्च वर्णीयांना दिला आहे.
  •  आदिवासींना सरकारी नोकरी द्या आणि सध्याच्या अधिकाऱ्यांना हाकलून देण्याची केली होती मागणी
  •  आदिवासींना नक्षलवादी संबोधू नये, सरकारला दिला होता इशारा
  • दिवासी राहतात त्या भागावर आदिवासींचेच राज्य
  •  मुलगा भुपेश हा कायम मुख्यमंत्रीपदी कायम रहावा, अशी त्यांची अपेक्षा
  •  मुलगा भुपेश मुख्यमंत्री असला तरी सत्तेच्या सर्व चाव्या आपल्याकडे असल्याचा दावा, थोडक्यात सरकारचा रोमोट आपल्याच हाती
  •  तीन लाख लोकांना २०२० मध्ये बुद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी मोठा कार्यक्रम राजधानी रायपूरमध्ये घडवून आणला.
  •  हिंदू परंपरा यांना छेद देण्याची मानसिकता
  •  एकीकडे रावणाचे पूजन करून दुसरीकडे ब्राह्मणांना टार्गेट करण्याची परस्पर विरोधी मानसिकता. कारण रावण हा ब्राह्मण होता, हे ते सोयीस्कर विसरतात
  •  महिषासूर, मेघनादबरोबर दुर्गेची पूजा करण्याचे आवाहन करताना महिषासुराचा दुर्गेनेच वध केल्याचा त्यांना पडतो विसर

Controversial statements of Chhattisgarh Chief Minister’s father; Increased headaches for Congress

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात