शिवसेनेने हिंदुत्वाचे रक्षण ९२- ९३ मध्ये केले; पण हा उल्लेख करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोचले की अन्य कोणाला…!!??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह सर्व विरोधकांना टोला लगावल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. CM Uddhav Thackeray pinched Sharad Pawar over 1992 riots in Mumbai

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध विकास योजनांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन केले. त्यावेळी केलेल्या राजकीय भाषणात त्यांनी अर्थातच फटकेबाजी केली. त्याच्या बातम्या विविधांगांनी आलेल्या आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी 92 – 93 च्या दंगलीत शिवसेनेने हिंदुत्वाचे रक्षण केले आहे. त्यामुळे कोणी शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, असा टोला लगावला…!! याची चर्चा मराठी माध्यमांनी टाळली असे दिसते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, शिवसेनेचे राज्यातले मंत्री एकनाथ शिंदे, कल्याण डोंबिवलीतले शिवसेना आणि भाजपचे आमदार, नगरसेवक उपस्थित होते.

पण 92 – 93 चा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी नेमके भाजपचे कान टोचले की अन्य कोणाचे कान टोचून घेतले…??, याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.

1992 – 1993 मध्ये महाराष्ट्रात सरकार कोणाचे होते? त्या वर्षी असे काय घडले होते? की शिवसैनिकांना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी रस्त्यावर यावे लागले होते…!!??, असे प्रश्न सोशल मीडियावर चर्चिले जाऊ लागले आहेत.



92 – 93 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचे सुधाकरराव नाईक आणि शरद पवार यांचे सरकार होते. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईत बॉम्बस्फोट आणि
हिंदू – मुस्लिम दंगली झाल्या होत्या. त्या दंगलींमध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसेनेने जबरदस्त पुढाकार घेतला होता. याचाच अप्रत्यक्ष उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी फक्त भाजपला टोचण्याचा उल्लेख जरी मराठी माध्यमांनी केला असला तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, त्यांचाच सध्याचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना एक प्रकारे टोला हाणून घेतला आहे, असे स्पष्ट होते.

शिवाय शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडलेली नाही हेही यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधोरेखित करून घेतले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या बातम्या देताना मराठी माध्यमांनी मात्र फक्त यांनी भाजपला आणि मनसेला टोला एलआयसी हाणल्याचे एकतर्फी रिपोर्टिंग केले आहे.

CM Uddhav Thackeray pinched Sharad Pawar over 1992 riots in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात