प्रतिनिधी
नवी दिल्ली – ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. Narayan Rane targets sharad pawar over ED inquires of anil deshmukh and anil parab
नारायण राणे म्हणाले, की केंद्र सरकार सज्जन लोकांच्या विरोधात कधीही कारवाई करीत नाही. त्यामुळे सध्या चौकशी सुरू झालेले मंत्री अनिल परब आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सज्जन आहेत किंवा कसे, हे शरद पवारांनी स्वतःच तपासून ठरवावे. आणि त्यांना तरीही काही वावगे वाटत असल्यास पवार नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटत असतातच, तेव्हा ईडी, सीबीआयची तक्रार त्यांनी पंतप्रधानांकडे करावी, असा टोला नारायण राणे यांनी शरद पवारांना लगावला.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा दणदणीत पराभव झाला. आता त्याचीच पुनरावृत्ती आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही होणार आहे, असा घणाघातही नारायण राणे यांनी यावेळी केला.
-मुख्यमंत्र्यांना घेरले
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून मुख्यमंत्र्यांना स्वतःलाच बंदिस्त होऊन घरातच बसून रहायचे आहे, असा टोला राणे यांनी लगाविला. ते पुढे म्हणाले, केवळ हिंदूंचे सण आणि उत्सव आल्यावरच राज्य सरकारला करोना संसर्गाची आठवण येते. देशात फक्त महाराष्ट्रातच तिसरी लाट येईल, असे राज्य सरकार सांगत आहे. मात्र, त्यांचे सत्ताधारी पक्ष आपले सर्व राजकीय कार्यक्रम, मेळावे मोठी गर्दी जमवून घेतात, तेव्हा करोना होत नाही. घरावर दगडं फेकायला गर्दी पाठवतानाही करोना होत नाही, केवळ हिंदूंचे सण साजरे करतानाच करोना होतो. मात्र, आम्ही आमचे सण आणि उत्सव योग्य ती काळजी घेऊन साजरे करणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.
घरावर दगडं फेकणाऱ्यांचा सत्कार राज्याचे मुख्यमंत्री करतात, ही नेमकी कोणती विचारसरणी आहे; असा सवाल राणे यांनी विचारला. शिवसेनेने आजपर्यंत कोकणासाठी आणि कोकणी माणसासाठी काहीही केले नाही. नवे काहीच करायचे नाही आणि जे आहे ते बंद करायचे, असा शिवसेनेचा आजवरचा इतिहास आहे. अतिवृष्टी आणि महापुराची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली नुकसान भरपाई अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे कोकणाचा विकास आम्ही केला, या शिवसेनेच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचेही राणे यांनी यावेळी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App