विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये डेंगी तापाने सर्वसामान्य हवालादिल झाले आहेत. फिरोजाबादमध्ये गेल्या तीन दिवसांत ४१ जणांना मृत्यू डेंगीमुळे झाला आहे. मृतांमध्ये ३६ मुलांचा समावेश आहे. मथुरेत डेंगीमुळे १२ मुलांसह १४ जणांचा जीव गेला आहे. UP shatters due to dengue
आजाराच्या फैलावामुळे मथुरेतील कोहा गावातील ५० पेक्षा अधिक कुटुंबे गाव सोडून गेले आहेत. गावात डेंगी, स्क्रब टायफस, मलेरिया व लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुलांमध्ये डेंगीची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य अधिकारीही चिंतेत पडले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात दक्षतेचा इशारा दिला आहे.
फिरोजाबादमध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंगीच्या तापाने ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यात तब्बल ३६ मुलांचा समावेश आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी फिरोजाबाद जिल्ह्याच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना हटविण्याचा आदेश दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App