तालिबान ही अत्यंत क्रूर संघटना, त्यांच्याबाबतचे सारे अंदाच चुकल्याची ब्रिटन, अमेरिकेची कबुली


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : ‘तालिबान संघटनेचा अनुभव मी घेतला आहे. ही फार पूर्वीपासून अत्यंत क्रूर संघटना आहे. त्यांच्यात आता बदल झाला आहे की नाही, ते पहावे लागेल,’ असे अमेरिकेचे लष्करप्रमुख जनरल मार्क मिली यांनी म्हटले आहे. Taliban is very dangerous terrorist organization

ते म्हणाले ‘तालिबानचे भवितव्य कसे असेल, हे माहिती नाही. मात्र, संघर्षावेळी त्यांच्याशी आलेल्या संबंधांवरून ही एक क्रूर संघटना असल्याचे लक्षात आले आहे.

दरम्यान, संपूर्ण अफगाणिस्तानचा अत्यंत वेगाने ताबा मिळविणाऱ्या तालिबानबाबत अंदाज चुकल्याचे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांनी कबूल केले आहे. ‘या वर्षाच्या अखेरीपर्यंत काबूलचा पाडाव होणार नाही, असा गुप्तचरांचा अहवाल आम्हाला मिळाला होता.



विदेशी सैन्य निघून गेल्यावर देश काबीज करण्यास तालिबानला काही महिने तरी लागतील, असे आम्हाला वाटत होते. मात्र, तालिबानने अनपेक्षित वेगाने सर्व देश ताब्यात घेतला,’ असे राब म्हणाले. अफगाणिस्तानमधील अश्रफ घनी यांचे सरकार किती काळ टिकेल, याबाबत ब्रिटनप्रमाणेच अमेरिकेचाही अंदाज साफ चुकला.

Taliban is very dangerous terrorist organization

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात