वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीती प्रख्यात उदयोगसमूह सुपरटेक लिमिटेडला सर्वोच्च न्यायालयाने जबर तडाखा दिला असून नोएडातील दोन चाळीस मजली टॉवर पाडण्याचे आदेश दिले आहेत. नोएडातील प्रशासकीय अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांत हे दोन्ही टॉवर पाडण्यात यावेत. या सगळ्या पाडकामाची भरपाई देखील ‘सुपरटेक’कडून दिली जावी असेही न्यायालयाने आदेशांत म्हटले आहे. Remove two towers immediately tells SC to supertech
या टॉवरमध्ये घरे खरेदी करणाऱ्यांना त्यांनी घरे बुक केली त्या दिवसापासून बारा टक्के एवढ्या व्याजदराने सगळी रक्कम परत द्यावी तसेच या टॉवरच्या उभारणीमुळे रहिवासी कल्याण संघटनेला जो मनस्ताप झाला त्याबद्दल त्यांना दोन कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी असेही न्यायालयाने आदेशांत म्हटले आहे. न्या. डी. वाय.चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे निर्देश दिले.
या प्रकल्पाच्या उभारणीसाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. ‘अपेक्स’ आणि ‘केन’ या दोन्ही टॉवरची उभारणी सुरू असतानाच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ते पाडण्याचे निर्देश दिले होते. यानंतर ‘सुपरटेक’ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App