आईच्या प्रियकराकडून बलात्कार, पीडित तरुणीला उच्च न्यायालयाने दिलीगर्भपाताची परवानगी


विशेष प्रतिनिधी

नागपूर : आईच्या प्रियकराकडून झालेल्या लैंगिक शोषणामुळे गर्भवती झालेल्या बलात्कार पीडितेतला उच्च न्यायालयाने गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. पीडित तरुणी १७ वर्षे वयाची असून, तिच्या गर्भात २० आठवड्यांचे बाळ आहे. तिने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी याचिका दाखल केली होती. Rape by mother’s lover, High Court allows abortion for victim

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेता, बलात्कार पीडित तरुणीला गर्भपात करण्याची परवानगी दिली. याचवेळी गर्भाच्या डीएनए चाचणीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्ती विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्या न्यायपीठाने पीडित तरुणीला हा दिलासा दिला.

२०१५ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर तरुणीच्या आईने मुख्य आरोपी अनिलकुमार श्रीवास्तव याच्यासोबत संबंध जोडले. दरम्यान, श्रीवास्तवने तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. सततचा शारीरिक-मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर मुलीने २५ जून २०२१ रोजी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून श्रीवास्तवसह तीन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rape by mother’s lover, High Court allows abortion for victim

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात