स्वदेशी नागरी विमानाच्या चाचण्या यशस्वी, हिंदूस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडची माहिती

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू : नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या प्रमाणपत्रासाठी हिंदुस्तान-228 (व्हीटी-केएनआर) या स्वदेशी नागरी विमानाची मैदानी आणि लो स्पीड टॅक्सी चाचणी (एलएसटीटी) यशस्वी ठरली, अशी माहिती हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) दिली आहे. Successful tests of indigenous civil aircraft, information of Hindustan Aeronautics Limited

पंख जोडलेल्या विमानांची देशात पहिल्यांदाच निर्मिती करण्यात आली असून, हे एक मोठे यश आहे. या माध्यमातून क्षेत्रीय जोडणीच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे, असे हिंदुस्तान एअरोनॉटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सजल प्रकाश यांनी सांगितले.



टाईप सर्टिफिकेशनमुळे या विमानाच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणनासाठी देखील मदत मिळणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून एफएआर-23 प्रमाणपत्राची गरज पूर्ण झाली आहे, अशी माहिती नागरी उड्डयन महासंचालनालयाचे संचालक इंद्रनील चक्रवर्ती यांनी दिली.

ही चाचणी कानपूर येथील कंपनीच्या सुविधेत स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचा एक भाग होता, असे हिंदुस्तान एअरोनॉटिक्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Successful tests of indigenous civil aircraft, information of Hindustan Aeronautics Limited

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात