विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – लॉकडाउनमुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या तसेच इंधनाचे दर वाढल्याने महागाईही वाढली होती. आता मात्र हा दर साडेपाच टक्क्यांच्या मर्यादेत आल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मागील वर्षीच्या जुलै महिन्यात हाच दर ६.७३ टक्के होता. Inflation rate is going slow
अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने किरकोळ महागाईचा दर जुलै महिन्यात कमी झाला असून तो ५.५९ टक्क्यांवर आला आहे. महागाईचा दर मे महिन्यात ६.३० टक्के तर जून महिन्यात ६.२६ होता.
जून महिन्यात अन्नधान्यामुळे होणारी चलनवाढ ५.१५ टक्के होती, ती जुलैमध्ये ३.९६ टक्के एवढी कमी झाली. रिझर्व्ह बँकेने नुकतेच पतधोरणाच्यावेळी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत महागाईचा दर ५.९ टक्के राहील असा अंदाज वर्तविला होता. रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय धोरण समितीने चलनवाढीचा आदर्श दर ६ टक्क्यांच्या आत राहायला हवा असे उद्दिष्ट ठेवले आहे. जुलैमधील दर आता त्या टप्प्यातच आहे, असेही दाखवून दिले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App