कोरोना बातमीत मुस्लिम व्यक्तीचा फोटो वापरल्याने शर्जिल इस्माईलची एनडीटीव्हीला धमकी; उत्तर दिले; पण ट्विटही हटवित झुकले!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वतंत्र पत्रकारितेचे ढोल पिटणाऱ्या एनडीटीव्हीचे पाय मातीचेच असल्याचा दिसून आले आहे. मुस्लिम अक्टिव्हिस्ट शर्जिल इस्माईलने दिलेल्या धमकीमुळे एनडीटीव्हीने आपले ट्विट हटविले.
एनडीटीव्हीने कोरोना संदर्भात एक बातमी दिली होती. त्यामध्ये एका मुस्लिम व्यक्तीचा फोटो वापरला होता.Sharjeel Ismail threatens NDTV for using photo of Muslim man in Corona News; Answered; But even the tweets tend to be deleted!

कोरोना टेस्ट करून घेतानाचा हा फोटो होता. मात्र, या फोटोवर शरजिल इस्माईलने आक्षेप घेतला. मुस्लिमांना बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप करत कोरोनाच्या बातमीत मुस्लिम व्यक्तीचाच फोटो का दाखविला असा सवाल त्याने केला. शरजिलने त्याही पुढे जाऊन मागणी केली की एनडीटीव्हीतील कोणी कोरोनाच्या बातमीत हा फोटो वापरण्याचा निर्णय घतला हे सांगण्याची मागणी केली. वाटल्यास आपल्याला वैयक्तिकरित्या याची माहिती द्यावी असेही त्याने म्हटले.



एनडीटीव्हीच्या संपादकीय संचालक सोनिया सिंह यांनी याबाबत शरजिलला उत्तर दिले. त्यांनी म्हटले की या फोटोत एक भारतीय नागरिक कोरोना चाचणी करताना दाखविला आहे. शरजिलने आपला अजेंडा पुढे रेटण्यासाठी आम्हाला धमाऊ नये, असेही म्हटले. परंतु, एनडीटीव्हीचा हा स्वतंत्र बाणा काही काळच टिकला. शेवटी दबावासमोर झुकून हे ट्विट हटविण्यात आले.

त्यावर शरजिलने म्हटले की इस्लामोफशेबियाने ग्रस्त असलेल्या लोकांना घाबरविण्याची गरज नाही. कारण लोकांना आमच्या अस्तित्वाचीच दहशत आहे.मुळात फोटो वापरणाºया पत्रकाराचे नाव विचारण्याचे शरजिलचे कारणच काय? असा सवालही करण्यात येत आहे.

अशा प्रकारणात एखाद्याचे नाव समजल्यावर इस्लामी कट्टरवादी किंवा दहशतवादी त्याच्यासोबत काय करतात हे सर्वांना माहित आहे. शार्ली हेब्दोसारखी घटना घडू शकते. त्या पत्रकारावर हल्ला केला जाऊ शकतो.आजपर्यंत हिंदूंच्या सहिष्णुतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर टीका करणारा एनडीटीव्ही इस्लामी मूलतत्ववाद्यांसमोर कसा झुकला? असा सवालही करण्यात येत आहे

Sharjeel Ismail threatens NDTV for using photo of Muslim man in Corona News; Answered; But even the tweets tend to be deleted!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात