शर्जिल उस्मानीने राज्य घटनेचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप, सरकार विशेष वागणूक देत असल्याची टीका

वृत्तसंस्था

मुंबई – एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या शर्जिल उस्मानीलाही आता हे महाविकास आघाडी सरकार छत्राखाली घेऊन विशेष वागणूक देत आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. BJP lashes On Mharashtra govt. on Sharzil Usmani case

शर्जिल उस्मानीने तपासात पोलिसांना सहकार्य केल्यास त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार नाही, असे सरकारतर्फे उच्च न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यावरून भाजपचे प्रवक्ते उपाध्ये म्हणाले, आजवर तपासात पोलिसांना सहकार्य करणाऱ्या किती गुन्हेगारांना पोलिसांनी अशी सवलत दिली, असा प्रश्नंही त्यांनी विचारला आहे.शर्जिलने याप्रकरणी राज्य घटनेचाही अपमान केला आहे. उस्मानीच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र महाविकास आघाडी सरकारने राज्य घटनेचा अपमानही सहन केल्याचे उपाध्ये म्हणाले.

शर्जिलचे वक्तव्य गंभीर असूनही त्याच्याविरुद्ध कठोर कलमांखाली गुन्हा का दाखल केला जात नाही, असा प्रश्नदही उपाध्ये यांनी केला आहे. सत्तेत आल्यापासून सर्व प्रकारच्या गुन्ह्यांतील आरोपींना संरक्षण द्यायची हीच या सरकारची भूमिका राहिल्याचे वारंवार पाहायला मिळते आहे.

BJP lashes On Mharashtra govt. on Sharzil Usmani case

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*