विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘ भारतामध्ये राहणाऱ्या आणि येथे काम करणाऱ्यांना देशाचे कायदे पाळायलाच हवेत.’’ अशी तंबी नवनियुक्त माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री आश्विशनी वैष्णव यांनी ट्विटर या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मला दिली आहे.Govt. and court warns Twitter
दरम्यान भारत सरकारने तयार केलेले नवे माहिती तंत्रज्ञानविषयक नियम पाळायचे नसतील तर ट्विटरला कायदेशीर संरक्षण मिळू शकत नाही. या प्लॅटफॉर्मने भारतामध्ये ग्राहक तक्रार निवारण अधिकारी नेमणे गरजेचे आहे.’’ असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने मांडले.
न्यायालयाने ट्विटरला याबाबतचे शपथपत्र दोन आठवड्यांमध्ये सादर करण्यास सांगितले असून त्यामध्ये याबाबतची सविस्तर माहिती देण्यात यावी असे स्पष्टपणे नमूद केले आहे. ‘‘ भारतातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत ट्विटर स्वतःला पाहिजे तेवढा वेळ घेऊ शकत नाही.’’
अशी तंबी न्यायालयाने दिल्यानंतर ट्विटरने देखील माघार घेत मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार निवारण अधिकारी आणि संपर्कासाठी नोडल व्यक्तीची नेमणूक करण्यात येईल असे सांगितले.
मे महिन्याच्या अखेरपासून नवे माहिती आणि तंत्रज्ञानविषयक नियम लागू करण्यात आले असून त्याला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी आक्षेप घेतला आहे. यामध्ये ट्विटर आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App