भारतीय नागरिकांच्या संतापानंतर ट्विटरला उपरती, भारताचा चुकीचा नकाशा हटविला


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतीय नागरिकांच्या प्रचंड संतापानंतर ट्विटरला अखेर उपरती झाली आहे. ट्वटरने आपल्या सोशल मीडिया साइटवरून भारताचा चुकीचा नकाशा अखेर हटवला आहे.ट्विटरने भारताचा चुकीचा नकशा दाखवल्याने भारतीय संताप झाला.After the anger of Indian citizens, Twitter deleted the wrong map of India

अनेक नागरिकांनी ट्विटरवर कडक कारवाईची मागणी केली होती. जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळे दाखवणारा चुकीचा नकाशा ट्विटरने आपल्या साइटवर दाखवला होता.ट्विटरने आपल्या साइटवर जो नकाशा दाखवला होता त्यात जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगळा देश दाखवण्यात आले होते.



हा नकाशा ट्विटरच्या करिअर पेजवर होता. या नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळे दाखवण्यात आले होते. एका यूजरने हा ट्विटरच्या विकृतीचा भंडाफोड केला.चुकीचा नकाशा दाखवल्याने ट्विटरवर कठोर कारवाई करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

केंद्र सरकार आणि ट्विटरदरम्यान सुरू असलेल्या वादात हे नवे प्रकरण समोर आल्याने ट्विटर गोत्यात येण्याची शक्यता आहे. ट्विटरने आपल्या साइटवरून भारताचा चुकीचा नकाशा हटवला असला तरी ही गंभीर चूक आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला ठेच पोहोचवणारी आहे. यामुळे केंद्र सरकार या प्रकरणी आता कुठली मोठी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

After the anger of Indian citizens, Twitter deleted the wrong map of India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात