विशेष प्रतिनिधी
ढाका – बांगलादेशची राजधानी ढाक्यात कारखान्याला लागलेल्या आगीत ५२ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जखमी झाले. अजूनही ४० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी जळत्या इमारतीतून उड्या मारल्या आणि त्यात काहींचा जीव गेला. 52 peoples died in Bangladesh Fire
सहा मजली इमारतीच्या खालच्या मजल्याला आग लागली आणि ती वरच्या मजल्यापर्यंत पसरली. रासायनिक पदार्थ आणि प्लॅस्टिकमुळे आग वेगात पसरल्याचा संशय व्यक्त केला आहे. एका जखमी मजुराने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत आग पसरली तेव्हा जिन्याच्या दोन्ही बाजूचे दरवाजे बंद होते. त्यावेळी त्या मजल्यावर ४८ जण होते. त्यांचे काय झाले असेल, हे सांगू शकत नाही, असे तो म्हणाला.
बांग्ला देशाची आंबा डिप्लोमसी, शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून पाठविले २६०० किलो आंबे
नारायणगंजच्या रुपगंज येथील शेजन ज्यूस कारखान्यात आग लागली. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोचले आणि त्यांनी इमारतीत अडकलेल्या २५ जणांना वाचवले. आतापर्यंत एकूण किती जणांचा मृत्यू झाला, हे सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. आग नियंत्रणात आल्यावरच सर्वकाही स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. भीषण आगीत अनेक जण भाजले असून काही जणांनी उड्या मारल्यामुळे जखमी झाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App