अमेरिकेची अफगाणिस्तान मोहिम ३१ ऑगस्टला संपणार, तब्बल एक हजार अब्ज डॉलर खर्च


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये वीस वर्षांपूर्वी सुरु केलेली लष्करी मोहिम ३१ ऑगस्टला संपविली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केले. तसेच, या संघर्षग्रस्त देशाची ‘राष्ट्र-उभारणी’ करण्यात रस नसल्याचेही बायडेन यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे अफगाणिस्तानमधील ९० टक्के सैनिक माघारी आले आहेत. USA withdraw its forces from Afganistan

११ सप्टेंबर, २००१ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सुरु केलेली मोहिम ३१ ऑगस्टला संपणार आहे. या वीस वर्षांच्या काळात अमेरिकेने या मोहिमेसाठी एक हजार अब्ज डॉलर खर्च केले आहेत. दहशतवाद्यांविरोधात लढताना २४४८ सैनिकांचा मृत्यू झाला, तर २०,७७२ जण जखमी झाले आहेत.बायडेन म्हणाले की, ‘अधिक हल्ले करण्यापासून तालिबानला रोखण्याचा आमचा उद्देश पूर्ण झाला आहे. त्यामुळे माघारी परतण्याची हीच वेळ आहे. आम्ही किती काळ तिथे राहिलो तरी त्यांचे अंतर्गत प्रश्ना सोडवू शकत नाही. आमच्या सैनिकांच्या आणखी एका पिढीला अफगाणिस्तान युद्धात अडकविण्याची आमची इच्छा नाही. राष्ट्रउभारणी करण्यासाठी आम्ही अफगाणिस्तानात थांबण्याची गरज नाही. अफगाणिस्तानच्या जनतेनेच ही जबाबदारी स्वीकारणे आवश्यतक आहे. त्यांना देश कसा हवा आहे, हे त्यांचे त्यांनी ठरवावे.’

USA withdraw its forces from Afganistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात