संभाव्य तिसऱ्या लाटेविरुध्द जय्यत तयारी, देशभरात १५०० हून अधिक ऑक्सिजन प्लांट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

PM Modi Cabinet Expansion Today, five Ministers Given Resign ahead of Ceromony, Know About New Ministers in Modi Team

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या संभाव्य लाटेविरुध्द लढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. देशभरात 1,500 पेक्षा जास्त आॅक्सिजन प्लॅँट उभारले जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. Preparations against a possible third wave, more than 1,500 oxygen plants across the country, Prime Minister Narendra Modi’s information

पंतप्रधान म्हणाले, ऑ क्सिजन प्लॅँट पीएम केयर्स फंडमधून उभारले जात असून यामुळे देशातील 4 लाख पेक्षा जास्त ऑक्सिजन बेडला आधार मिळणार आहे. हे प्लांट लवकरात लवकर सुरु होणार असून यासाठी आवश्यक त्या उपायोजना करण्यात येणार आहे.

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची कमतरता भासली होती. यामुळे देशातील असंख्य लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर मोदी सरकारने देशातील ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिले होते.



देशात येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेल्या राज्यांना कडक पाऊले उचलण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. अशावेळी देशातील औषधांचा साठा, ऑक्सिजन आणि अत्यावश्यक सामग्रींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार कामाला लागल आहे.

ऑक्सिजन प्लांट चालविण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. त्यामुळे आवश्यकतेच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. ऑक्सिजन प्लॅँटच्या कार्यपद्धतीचा मागोवा घेण्यासाठी आयओटीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

Preparations against a possible third wave, more than 1,500 oxygen plants across the country, Prime Minister Narendra Modi’s information

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात