बार्लांच्या मंत्रिपदावरून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस – भाजपमध्ये तू तू मै मै


विशेष  प्रतिनिधी

कोलकता : अलीपूरद्वारचे खासदार जॉन बार्ला यांना केंद्रीय मंत्रिपद देण्याने भाजपचा बंगालच्या विभाजनास पाठिंबा असल्याचे सिद्ध होते, असा दावा तृणमूल काँग्रेस पक्षाने केला आहे.TMC targets BJP over minister issue

तृणमूलचे नेते सौगत रॉय म्हणाले की, बार्ला यांनी बंगालच्या विभाजनाची वक्तव्ये केली आहेत. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणाऱ्या भाजपने त्यांच्या विधानांना पाठिंबा आहे का, हे स्पष्ट करावे. बार्ला हे विभाजनवादी प्रवृत्तीचे आहेत.गेल्या दोन वर्षांत संसदेत धड बोलताना सुद्धा मी पाहिले नाही. त्यावरून ते कोणत्या प्रकारचे मंत्री ठरतील याचा अंदाज कुणीही बांधू शकेल.भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तृणमूलची टीका फेटाळून लावली. ते म्हणाले की, हे आरोप निराधार आहेत.

बंगालच्या कोणत्याही विभाजनास पक्षाचा पाठिंबा नाही. बार्ला हे चांगले मंत्री ठरतील आणि ते जनतेसाठी कार्य करू शकतील असे पक्षनेतृत्व आणि आमच्या पंतप्रधानांना वाटले. त्यामुळे त्यांचा समावेश करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेइतके यश आले नसले तरी उत्तर बंगालमध्ये केंद्रातील सत्ताधारी पक्षाने लक्षवेधी मुसंडी मारली. या कामगिरीचे शिल्पकार बार्ला होते.

उत्तर बंगाल हा केंद्रशासित प्रदेश करण्याची जाहीर मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे ते तृणमूलच्या टीकेचे केंद्रस्थान ठरले. याच बार्ला यांना अल्पसंख्याक कल्याण खात्याचे राज्य मंत्रिपद देण्यात आले.

TMC targets BJP over minister issue

विशेष  प्रतिनिधी

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात