विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत भारतात प्रतिजैविकांचा म्हणजेच अँटिबायोटिक्सचा खप प्रचंड वाढला होता, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला.Use of Antibiotics increased in India
त्यानुसार, भारतात जून २०२० ते सप्टेंबर २०२० या कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अत्यंत प्रभाव असतानाच्या काळात प्रतिजैविकांच्या २१ कोटी ६४ लाख, तर अॅझिथ्रोमायसिन या औषधाच्या ३ कोटी ८० लाख अतिरिक्त मात्रांचा वापर झाला. मात्र, प्रतिजैविकांचा असा वापर चुकीचा आहे.
कारण, प्रतिजैविकेही जिवाणूमुळे झालेल्या संसर्गावर प्रभावी असतात, कोरोनासारख्या विषाणूमुळे झालेल्या संसर्गावर त्यांचा प्रभाव पडत नाही, असे संशोधकाचे म्हणणे आहे. प्रतिजैविकांचे अतिसेवन केल्यास त्याचे दुष्परिणामही दिसू शकतात.
संशोधकांच्या मते प्रतिजैविकांना शरीरातूनच प्रतिकार होणे, हा सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठा धोका आहे. प्रतिजैविकांचा अतिवापर केल्याने छोट्या जखमांवर आणि न्यूमोनियासारख्या सर्वसामान्य संसर्गावर परिणामकारकरित्या उपचार करण्याची त्यांची क्षमता कमी होते. म्हणजेच, हे सामान्य आजारही गंभीर स्वरुप धारण करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App