विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाविरुध्दच्या लढाईचे कौतुक केले जात असतानाच आणि उद्धव ठाकरे यांचे जगातील सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री असे गौरव प्रमाणपत्र दिले जात असतानाच महाराष्ट्राने एक दुर्दैवी टप्पा पार केलाय. महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या एक लाखाच्या पलीकडे गेली आहे. महाराष्ट्र जर देश मानला तर एक लाख बळींची संख्या पार करणारा तो जगातील दहावा देश (भारताला धरून) समजला जाईल. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे, महाराष्ट्रातील मृत्यूंचे प्रमाण (प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे) देशाच्या सरासरी मृत्यूंपेक्षा जवळपास साडेतीन पट आहे. देशात दहा लाख लोकसंख्येमागे २५१ बळी गेले असताना महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण तब्बल ८१४ इतके आहे. Maharashtra covid deaths crossed One lakh grim milestone
दुसरया शब्दांत सांगायचे झाल्यास जर महाराष्ट्राने कोरोनाचे व्यवस्थापन आणखी कार्यक्षमपणे केले असते तर देशाची परिस्थिती आणखी चांगली राहिली असती. कारण देशातील प्रत्येक तीन मृत्यूंमागे एक मृत्यू महाराष्ट्रातील आहे. देशांतर्गंत राज्यांतील स्थितींचा विचार केला तर महाराष्ट्राच्या भीषणतेचे चित्र आणखीनच भयावह वाटते. महाराष्ट्रातील बळी गुजरात-केरळच्या दहापट, बंगालच्या सहापट, यूपीच्या पाचपट, दिल्ली- तमिळनाडूच्या चारपट, कर्नाटकच्या तिप्पट आहेत. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूंच्या भयावहतेमध्ये महाराष्ट्रापेक्षा फक्त दिल्लीच पुढे आहे. दिल्लीत दहा लाख लोकसंख्येमागे १२९४ मृत्यू आहेत.
यूपी : विस्मयकारक कामगिरी
एकीकडे ठराविक माध्यमांनी उत्तर प्रदेशचे अतिशय नकारात्मक आणि भीतीदायक चित्र रंगविले असले तरी आकडे मात्र अजिबातच तसे नाहीत. २४ कोटी लोकसंख्या असताना (म्हणजे महाराष्ट्राच्या दुप्पट) यूपीत एकूण रूग्णांची संख्या १६.९८ लाख आहे, तर मृत्यूंची संख्या २१२३६ इतकी आहे. म्हणजे प्रति दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण फक्त ८८.४ इतकेच आहे. याउलट महाराष्ट्रात हे प्रमाण ८१४ इतके आहे. याशिवाय देशात सर्वाधिक चाचण्या यूपीत झाल्या आहेत, पॅझिटिव्हिटी रेटदेखील सर्वांत कमी आहे आणि रिकव्हरीचे प्रमाणही जवळपास ९५ टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App