सिंगापूरने १२ ते १५ वयाच्या बालकांचेही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फायझर – बायोएनटेक लस लहान मुलांसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
सिंगापूर : सिंगापूरने १२ ते १५ वयाच्या बालकांचेही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फायझर – बायोएनटेक लस लहान मुलांसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. फायझर-बायोएनटेक ही लस १२ ते १५ वयोगटातील मुलांवर १०० टक्के प्रभावी असल्याचा निर्वाळा कंपनीने दिला होता. त्यासाठी कंपनीने मुलांवर चाचण्याही घेतल्या होत्या. Children between the ages of 12 and 15 will also be vaccinated in Singapore, Pfizer vaccine allowed
फायझर कंपनीने दावा केला आहे की त्यांची लस १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी प्रभावी आहे. अमेरिकेमध्ये १६ वर्षांवरील मुलांना फायझरची लस दिली जाते. मॉडर्ना लसीच्याही लहान मुलांवर चाचण्या सुरू आहेत.
Pfizer Vaccine : फायजर कंपनीची नफा न कमावता भारताला कोरोनावरील लस देण्याची घोषणा
सिंगापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना लसीचे कवच देऊन सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फायझर लसीच्या झालेल्या परीक्षणात लहान मुलांमध्ये लस प्रौढांइतकीच प्रभावी असल्याचे सिध्द झाले आहे. त्याचबरोबर ही लस लहान मुलांसाठी सुरक्षितही आहे. त्याचबरोबर लसीच्या दोन डोसमधील अंतर तीन ते चार आठवड्यांहून सहा ते आठ आठवडे करण्याचा निर्णयही सिंगापूर प्रशासनाने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App