वृत्तसंस्था
लखनौ – गंगा नदीत मृतदेह आढळत असल्यावरून चोहोबाजूनी टीका सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकार आता जागे झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मृतदेहांमुळे गंगेत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून, गंगेचे पावित्र्य धोक्यात आल्याचा इशारा दिला आहे. UP CM Yogi Aditaynath spoke on Ganga issue
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी उत्तर प्रदेशला सरकारला नोटिस धाडली. त्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडले. तरीही, त्यांनी काही मृतदेह गंगेत तरंगत असले तरी आणखी काही नदीच्या किनारी वाळूत पुरले जात आहेत. आर्थिक कारणांवरून परंपरेतूनही ते गंगेत सोडले जात असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचप्रमाणे, अंत्यंसंस्काराचा खर्च न परवडणाऱ्या नागरिकांना त्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे आदेशही दिले.
उत्तर प्रदेश सरकारने तब्बल पाच दिवस या विषयावरून सोयीस्कर मौन पत्करले होते. बिहारच्या बक्सर शहरात गंगा नदीत सर्वप्रथम १०० मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. त्यानंतर, उत्तर प्रदेशने बिहारला दोष देणे सोयीचे वाटले. मात्र, हे मृतदेह गंगेच्या उत्तर प्रदेशातील प्रवाहात सोडण्यात आले. तिथून ते वाहत येत असल्याचा बिहारचा दावा आहे. त्यानंतर, गंगेत उत्तर प्रदेशातच मृतदेह सोडण्यात येत असल्याची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांनी मान्य केली. त्यातच,राज्यातील गाझिपूर, उन्नाओ आणि हमीरपूर या जिल्ह्यांतही गंगेत मृतदेह आढळले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App