विशेष प्रतिनिधी
मुंबई : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी 500 रुपये मिळतात हे मला माहीत होते, पण पोस्ट डिलीट करण्यासाठी सुद्धा वेगळे पैसे मिळतात, हे त्यांच्यामार्फत समजले, असा टाेला वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंना ती पोस्ट डिलीट करावी लागली. यावर सुजात आंबेडकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी मनपा निवडणुकीच्या वेळी एक आघाडी तयार केली होती. त्या आघाडीपासून आपण सावध राहिले पाहिजे. या आघाडीमध्ये उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट सहभागी होते.
या आघाडीच्या लोकांनी गुजराती उद्योजकांच्या विरोधात काम केले, मात्र याच राज ठाकरेंचे गौतम अदानी यांच्या घरी जाणे-येणे असते. धारावीचा प्रकल्प अदानींना कसा देता येईल, यासाठी ठाकरे परिवार काम करतो. हीच लोकं गणपतीच्या काळात एकमेकांच्या घरी जातात. अदानी आणि अंबानी यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार हे नेहमी पुढे असतात.
आंबेडकर म्हणाले की, राज्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, दिवाळीनंतर ही परिस्थिती आणखी खराब होणार आहे. हे आरएसएसचे लोक सत्तेत बसले आहेत, त्यांनी देवाच्या आणि हिंदूंच्या नावावर मते मागून सत्ता मिळवली आहे. सरकारने पिण्याच्या पाण्याची आणि अन्नधान्याची योग्य व्यवस्था केली नाही, तर आरएसएसचे जिल्हाप्रमुख आणि भाजपच्या जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर आम्ही रांगेत उभे राहून जेवण आणि पाण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंबेडकरांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App