पुणे पदवीधर निवडणूक : मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचे समोर आल्याने मतदान माेजणी केंद्रावर गाेंधळ

विशेष प्रतिनिधी

पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू असतानाच आठ मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचे समोर आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी यावर आक्षेप नोंदवला. या प्रकारामुळे निवडणूक अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून बालेवाडी येथील केंद्रावर मतमोजणी सुरू झाली. प्राथमिक फेऱ्यांची प्रक्रिया सुरू असतानाच काही मतपेट्या तपासणीसाठी टेबलवर आणण्यात आल्या. त्या वेळी आठ मतपेट्यांना आवश्यक असलेले निवडणूक आयोगाचे अधिकृत सील नसल्याचे महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी दावा केला.महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला. विनासील मतपेट्या आढळल्याचे समजताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला.



पोलिंग एजंट्सनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या मतपेट्या केंद्रात कशा आल्या, असा थेट सवाल केला. या गोंधळामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आक्षेपांची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया स्थगित केली.

पुणे पदवीधर मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात लढत रंगली आहे.

Pune Graduates’ Constituency Election: Chaos at the vote-counting center after it is discovered that ballot boxes lack official seals.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात