लोकल पास काढताना खिशाला बसणार झळ; 2 हजारांवरील UPI व्यवहारावर नवा चार्ज

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची रेल्वे तिकिटे किंवा उपनगरीय सीझन पास यूपीआयद्वारे खरेदी करणाऱ्या प्रवाशांना १५ ऑक्टोबरपासून अतिरिक्त ५.९० रुपये मोजावे लागणार आहेत. हा नवा नियम १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून अंमलात येणार असून उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटांसाठी तो लागू राहील. त्यामुळे एसी आणि प्रथम श्रेणीचे पास सहा रुपयांनी महागणार आहेत.

साप्ताहिक, पंधरवड्याचे, मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन पासची किंमत २ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही हा नियम लागू होणार आहे. प्रवाशांना रेल्वे खिडकीवर नेहमीप्रमाणे तिकीट खरेदी करता येईल, मात्र ऑनलाइन यूपीआय व्यवहारांवर हे अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.


‘मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प महाविकास आघाडीने गुंडाळला’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप


विशेषतः प्रथम श्रेणी आणि एसी पासधारकांना या शुल्काचा फटका बसणार आहे. सीएसएमटी-कर्जत/कल्याण मार्गावरील एसी मासिक पासची किंमत २,३४० रुपये असल्यास यूपीआयद्वारे तो खरेदी करताना प्रवाशाला आता २,३४५.९० मोजावे लागतील. त्याचप्रमाणे सीएसएमटी-कल्याण प्रथम श्रेणीचा त्रैमासिक पास ३, २९५ रुपये असून यूपीआयद्वारे व्यवहार केल्यास तो आता ३,३००.९० रुपयांना पडेल. सीएसएमटी-पनवेल एसी मासिक पासाची सध्याची किंमत २,७५० रुपये असून, पात्र यूपीआय व्यवहारात त्यासाठी २,७५५.९० रुपये मोजावे लागतील. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत मोठ्या संख्येने मासिक आणि त्रैमासिक पासधारक आहेत. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या आणि २ हजारांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर या शुल्काचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कैलास वर्मा यांनी हे शुल्क प्रवाशांवर न टाकता रेल्वेनेच सहन करावे, अशी मागणी केली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेत दररोज सुमारे ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे उपनगरीय रेल्वे व्यवहारांसाठी विशेष बाब म्हणून एमडीआर माफ करण्याचा प्रस्ताव रेल्वेने अर्थ मंत्रालयाकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.

AC, First-Class Passes to Cost More as 5.90 UPI Fee Kicks In Above 2,000

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात