विशेष प्रतिनिधी
पुणे: मागील काही दिवसात साखरेच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसला होता. गेल्या दोन महिन्यात साखरेच्या दरात जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाली होती. मात्र आता साखरेच्या दरात मोठी घट झाली आहे. ६४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचलेले दर सुमारे १५०० रुपयांनी घसरले आहेत. यामुळे देशात साखरेचा तुटवडा नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. Sugar
साखरेचे दर जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टचा पहिला आठवडा प्रतिक्विंटल ४५०० रुपयांच्या आसपास होते. ते १४ ऑगस्टला ४७०० ते ४८०० रुपयांवर पोहोचले. यामुळे बाजारात साखरेचा तुटवडा असल्याचे आभासी चित्र निर्माण करण्यात आले. परिणामी साठेबाजी होत गेली आणि साखरेच्या भावात वाढ झाली. या अनैसर्गिक दरवाढीचा फायदा शेतकरी किंवा कारखान्यांऐवजी साठेबाजांनाच मिळण्याची शक्यता होती. पण साखर बाजारात निर्माण झालेली अनैसर्गिक दरवाढ अवघ्या एका आठवड्यात पूर्णपणे ओसरली आहे.
नगरसेवक ते मुख्यमंत्री; ‘दबाव’ कसा हाताळतात? देवेंद्र फडणवीसांनी Gen Z ला सांगितला राजकीय प्रवासाचा किस्सा
काही दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल ६,४०० रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचलेले साखरेचे दर तब्बल १,५०० रुपयांनी खाली आले आहेत. गुरुवारी (२७ ऑगस्ट) साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल ४,८०० ते ५,००० रुपये असा रास्त दर मिळाला आहे. आता राज्य व राष्ट्रीय साखर संघाने देशात पुरेशी साखर शिल्लक असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्र सरकारने तत्परतेने साखरसाठ्याचा आढावा घेत साठा मर्यादा लागू केली आणि आयातीची घोषणा केली. दुसरीकडे शेतकरी संघटनांनी याप्रकरणी २० हजार कोटींचा साखर घोटाळा होत असल्याचा आरोप करत तीव्र आक्रमक पवित्रा घेतला. या चौफेर दबावामुळे साठवणूकदारांचे मनसुबे उधळले गेले आणि बाजारातील वातावरण अवघ्या आठवड्यात पूर्वपदावर आले.
आता येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामाच्या तोंडावर देशात सुमारे ३० ते ३४ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. तसेच आगामी हंगामातही गरजेनुसार पुरेसे उत्पादन होणार असल्याने किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रतिकिलो ४५ रुपयांच्या आसपास स्थिर राहण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App