नागपुरात ढोल-ताशांचा दणदणाट; मुख्यमंत्री फडणवीस हजारो युवकांशी साधणार संवाद

CM Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘मंथन-४ युवा अभियानाचा’ आज रेशीमबाग मैदानावर फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

गेल्या एका महिन्यापासून नागपुरात ‘मंथन ४ युवा अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य समारोप होणार आहे. नागपुरातील प्रसिद्ध रेशीमबाग मैदानावर या महा-कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.



बदलत्या काळातील तरुणांच्या अपेक्षा, त्यांचे प्रश्न आणि भविष्यातील संधी यावर या कार्यक्रमात सविस्तर मंथन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षांकडून सुरू असलेले हे प्रयत्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.

या समारोप कार्यक्रमाचे सर्वात मोठे आणि प्रमुख आकर्षण म्हणजे ढोल-ताशांचे महावादन. रेशीमबाग मैदानावर हजारो ढोल-ताशा वादक एकत्र येऊन सामूहिक वादन करणार आहेत. या अद्भुत आणि ऊर्जादायी सादरीकरणातून एका नवीन जागतिक विक्रमाची नोंद केली जाणार आहे.

CM Devendra Fadnavis to interact with thousands of youth at Nagpur dhol-tasha event

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात