विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : NEET Exam Paper Leak च्या दोषींविरुद्ध आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जवळपास 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 1.30 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला. उपोषण थांबवण्याची माहिती सोनम वांगचुक यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.Sonam Wangchuk
एकीकडे सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. 26 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला असून आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. सोनम सर, आपल्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण संपूर्ण देशाच्या विवेकाला जागृत केले. आपले जीवन या देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे, असं अभिजीत दीपके म्हणाले. तसेच कॉकरोच जनता पार्टीचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले शांततापूर्ण आंदोलन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत सुरूच राहणार आहे, असंही अभिजीत दीपके याने सोशल मीडिया पोस्ट वर लिहिले. त्याचबरोबर कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी सरकारशी कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये जाऊन चर्चा करणार आहेत.Sonam Wangchuk
सोनम वांगचुक यांच्या कोणत्या अटी मान्य?
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह, यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत याची माहिती दिली. जेपी नड्डा यांनी सोनम वांगचुक यांना सरकारचे संपूर्ण आश्वासन वाचून दाखवले. यामध्ये केंद्र सरकारने 3 महत्वाच्या अटी मान्य केल्या.
20 जुलै रोजी शांततेने आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही.
परीक्षेसंदर्भात पेपरफुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे.
नीट (NEET) पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचाही विचार केला जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App