वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेपरफुटी नंतर गाजलेली NEET (UG) परीक्षा आज झाली. संपूर्ण देशभर अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ही परीक्षा आज घेण्यात आली. विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर पोहोचताना गैरसोय होऊ नये म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आज कोलकात्याहून येताना नवी दिल्ली विमानतळावर काही वेळ थांबणे पसंत केले. प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर ते विमानतळावरून आपल्या निवासस्थान ७, लोककल्याण मार्गाकडे रवाना झाले.
पण या NEET (UG) परीक्षेला नेमके किती विद्यार्थी बसले होते आणि परीक्षेची व्यवस्था कशी होती??, याचा खुलासा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) केला.
National Testing Agency (NTA) issues a statement; says, "More than 20 lakh candidates sat for the NEET (UG) 2026 re-examination across 5,440 centres in India and 14 centres abroad today. The paper was administered in 13 languages, including Hindi and English. Extensive… pic.twitter.com/5OdsgphV0t — ANI (@ANI) June 21, 2026
National Testing Agency (NTA) issues a statement; says, "More than 20 lakh candidates sat for the NEET (UG) 2026 re-examination across 5,440 centres in India and 14 centres abroad today. The paper was administered in 13 languages, including Hindi and English. Extensive… pic.twitter.com/5OdsgphV0t
— ANI (@ANI) June 21, 2026
NTA ने जारी केलेल्या निवेदनानुसार, आज भारतातील ५,४४० आणि परदेशातील १४ केंद्रांवर NEET (UG) २०२६ ची पुनर्परीक्षा २० लाखांहून अधिक उमेदवारांनी दिली. ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह एकूण १३ भाषांमध्ये घेण्यात आली. १०,००० हून अधिक दिव्यांग उमेदवारांसह सर्वच उमेदवारांसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली होती.
वैद्यकीय समस्या असलेल्या सुमारे ८१ उमेदवारांसाठी विशेष सोय करण्यात आली होती; यामध्ये रस्ते अपघातात जखमी झालेला एक विद्यार्थी आणि केमोथेरपी घेत असलेला एक विद्यार्थी यांचा समावेश होता, ज्यांनी वर्षानुवर्षे तयारी केलेल्या परीक्षेला मुकणे टाळण्याचा दृढ निश्चय केला होता. परीक्षा केंद्रांवर आधार-आधारित बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळखण्याची प्रणाली), सीसीटीव्हीद्वारे देखरेख, जॅमर्स आणि राज्य पोलिसांच्या मदतीने दोन-स्तरीय तपासणी (frisking) यांसारख्या उपाययोजना लागू करण्यात आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App