ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा; पुढचे टार्गेट कोण??

Amit Shah

नाशिक : ऑपरेशन टायगर पूर्ण, उद्या दोन शिवसेनेचे स्वतंत्र मेळावे; नेमका राजकीय मुहूर्त साधून अमित शाहांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा!!, यामुळे सगळ्या देशाचे राजकारण महाराष्ट्रात एकवटले.Operation tiger completed, tomorrow Amit Shah in Kolhapur

– शिंदेंचा नेस्को संकुलात मेळावा

भाजपच्या महाशक्तीच्या आधारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर पूर्ण केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले सहा खासदार फुटले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला तो कदाचित उद्या 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनी गोरेगाव मधल्या नेस्को संकुलातल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन सुद्धा होईल. त्यामुळे भाजपच्या महाशक्तीच्या आधारावर एकनाथ शिंदेंची ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात वाढेल.



– ठाकरेंचा षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा

त्याचवेळी उद्धव ठाकरेंची ताकद महाविकास आघाडीत घटेल पण ते मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिन मेळावा साजरा करतील. खासदार तर फुटले आमदार आणि नगरसेवक हे फुटतील की काय, याचे सावट या मेळाव्यावर असेल. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्याच्या मेळाव्यात काय बोलणार आणि हाती उरलेली शिवसेना कुठपर्यंत सावरून धरणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेय.

– अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर

या पार्श्वभूमीवर उद्या 19 जून आणि परवा 20 जून अशा दोन दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून त्यांचे कोल्हापुरात कार्यक्रम होणार आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन आणि जवाहर कारखान्याचा नामविस्तार त्याचबरोबर कृतज्ञता मेळावा असे महत्त्वाचे कार्यक्रम अमित शाह यांच्या उपस्थितीत होणार आहेत. अमित शाहांच्या कार्यक्रमाला अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अग्रक्रमाने हजर राहणार असून शिवसेनेचा उद्याचा मेळावा आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा अमित शाहांच्या परवाच्या कोल्हापूर दौऱ्यात हजर राहतील.

– अमित शाहांचे पुढचे टार्गेट कोण??

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा कोल्हापूर दौरा नेमका राजकीय मुहूर्त साधून झाल्याने या पुढच्या काळात अमित शाह यांच्या टार्गेटवर कोण असेल??, शरद पवारांचे खासदार आणि आमदार त्यांच्याच पक्षात शिल्लक राहतील का??, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी अमित शाहांची काय योजना असेल??, त्या योजनेची मोडस ऑपरेंडी कशी असेल??, या सगळ्या मुद्द्यांची चर्चा सुद्धा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Operation tiger completed, tomorrow Amit Shah in Kolhapur

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात