नाशिक : 1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांचा 2026 मध्ये संजय राऊतांना फोन; म्हणाले, फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा, मोकळीक देऊ नका!!, ही राजकीय घडामोड आज घडली.
ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. पण त्यापैकी दोन खासदार परत आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलवून त्यासाठी व्हीप काढला. तो व्हीप सर्व खासदारांना लागू केला. या बैठकीला हजर न राहणाऱ्या खासदारांवर कारवाई करण्याची कायदेशीर व्यवस्था यातून केली.
पवारांच्या म्हणे संजय राऊतांना फोन
पण खासदारांच्या बैठकीला जाण्याआधी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन नेहमीप्रमाणे राजकीय फटकेबाजी केली. त्यांना म्हणे, शरद पवारांचा आज फोन आला होता. फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवा. त्यांना मोकळीक देऊ नका, असा सल्ला म्हणे शरद पवारांनी संजय राऊत यांना दिला. फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घ्यायची तयारी सुद्धा म्हणे, शरद पवारांनी दाखविली.
1991 मध्ये शरद पवारांनी शिवसेना फोडली
पण हे तेच शरद पवार आहेत, ज्यांनी 1991 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत शिवसेना फोडली होती. शिवसेनेतून छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली 18 आमदार फोडले होते. शरद पवारांनी छगन भुजबळांना फूस दिली होती. त्यांना मंत्रिपदाची लालूच दाखविली होती. छगन भुजबळांबरोबर 18 आमदार फुटले. त्यातले 6 आमदार परत शिवसेनेत गेले. पण शरद पवारांनी फुटलेल्या 12 आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेसमध्ये सामावून घेतले होते. छगन भुजबळ यांना मंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री केले.
नुसत्या बाता
पण 1991 मध्ये शिवसेना फोडणाऱ्या शरद पवारांनीच 2026 मध्ये मात्र फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवायची बात मारली. त्यांना मोकळीक द्यायची नसल्याची बात मारली. अगदी त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घ्यायची सुद्धा बात मारली. पण संजय राऊत यांनी शरद पवारांना तुम्ही आज फुटणाऱ्या खासदारांना धडा शिकवायच्या बाता मारताय, पण तुम्हीच 1991 मध्ये शिवसेनेचे 18 आमदार फोडले होतेत, असे सुनावण्याची हिंमत केली नाही. त्यांनी फक्त फुटणाऱ्या खासदारांच्या नावाने पुन्हा एकदा शिवीगाळ केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App