संजय राऊत म्हणाले, त्यांनी “ऑपरेशन टायगर” केले, तर आम्ही “ऑपरेशन लांडगा” करू; पण 2019 साली काय केले होते आणि त्यानंतर काय झाले??

नाशिक : त्यांनी “ऑपरेशन टायगर” केले, तर आम्ही “ऑपरेशन लांडगा” करू, या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे 2019 साली काय केले होते?? आणि त्यानंतर काय झाले??, असा सवाल विचारायची वेळ आली. Sanjay Raut

– ऑपरेशन लांडग्याची दमबाजी

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फोडून ऑपरेशन टायगर करणार आणि आपली शिवसेना वाढवणार, अशी बातमी आली. ही बातमी माध्यमांनी बरीच चघळली. उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली. पण त्या बैठकीपूर्वीच शिर्डीचे त्यांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल झाले. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पुन्हा उकळी फुटली. त्यावरच प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी राणा भीमदेवी थाटात त्यांनी ऑपरेशन टायगर केले तर आम्ही ऑपरेशन लांडगा करू, अशी दमबाजी केली.

शब्दांचे श्लेश म्हणून संजय राऊत यांची टायगर आणि लांडगा ठीक आहे. पण त्यांनी उडविलेल्या शाब्दिक फुलबाज्यांच्या पलीकडे त्याची किंमत नाही. पण त्यापलीकडे जाऊन ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन लांडगा या शब्दांची जरा खोलात जाऊन चिकित्सा केली, तर 2019 मधल्या घटना घडामोडींशी त्याचे साम्य दिसल्याशिवाय राहात नाही.



– पवार + ठाकरेंनीच तर केले होते “ऑपरेशन लांडगा”

2019 मध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून तर “ऑपरेशन लांडगा” केले होते. लांडगा हा प्राणी लबाडी साठी ओळखला जातो. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून तसेच लबाड राजकारण केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला बहुमत नसताना त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची लालूच दाखविली. त्यांना महायुतीतून फोडले. महायुतीला बहुमत असताना भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून रोखले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले.‌‌ हे काही काही “ऑपरेशन टायगर” नव्हते. ते “ऑपरेशन लांडगाच” तर होते. कारण लांडग्याची लबाडी करूनच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनमताच्या कौलाचा विश्वासघात केला होता. सत्तेवर कब्जा केला होता. त्यामुळे ठाकरे आणि पवारांना “ऑपरेशन लांडगा’ काही नवीन नाही. “ऑपरेशन टायगर” ते करू शकत नाहीत.

– “ऑपरेशन टायगर” 2022 मध्येच

पण साधारण अडीच वर्षे “ऑपरेशन लांडगा” सहन केल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी “ऑपरेशन टायगर” करून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी उभी फोडली. दोघांच्याही लांडगे वृत्तीला जबरदस्त धडा शिकवला. दोघांना कायमचे सत्तेबाहेर करून टाकले. याला “ऑपरेशन टायगर” असे नाव दिले गेले. हे ऑपरेशन टायगर 2022 मधूनच सुरू झाले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्या हातात त्यांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यासारखे काही शिल्लकच ठेवले नाही. हे खरे ऑपरेशन टायगर होते.

– नुसत्या शब्दांच्या फुलबाज्या

त्यामुळे संजय राऊतांनी आता शब्दांच्या किती फुलबाज्या उडविल्या किंवा भुईनाळे फोडले, तरी “ऑपरेशन टायगरचा” पुढचा भाग झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठीची वेळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडलेलीच राहील. संजय राऊत आणि त्यांच्या राजकीय गुरूंना “ऑपरेशन लांडगा” म्हणत हात चोळत गप्प बसावे लागेल. त्या पलीकडे काही घडण्याची शक्यता नाही.

Sanjay Raut said that they carried out “Operation Tiger”.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात