नाशिक : रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाची फक्त राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांनाच “काळजी”; महायुतीच्या इतर नेत्यांनी उडविली खिल्ली!!, असला प्रकार आज समोर आला. Rohit Pawar
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन आरंभले. पण खुद्द त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या स्थानिक आमदारांना या आंदोलनाची माहितीच नव्हती. प्रशासनाने नियमानुसार रोहित पवारांना आंदोलन करायची परवानगी दिली, पण रोहित पवारांनी वेगळीच आदळआपट केली. आपल्या आंदोलनाला शेतकरी येऊ नयेत, म्हणून पोलिसांनी आंदोलनाच्या स्थळाजवळची हॉटेल आणि खायचे ढाबे बंद केले. आंदोलकांची गैरसोय केली, असा आरोप रोहित पवारांनी केला.
राज्याच्या कृषिमंत्र्यांना “काळजी”
रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्यांना मात्र “काळजी” वाटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रोहित पवारांना चर्चेचे निमंत्रण पाठविले. माझ्या आंदोलनाला राजकीय स्टंट म्हणणाऱ्या सरकार बरोबर आपण चर्चा करणार नाही, असा उलटा निरोप रोहित पवारांनी पाठविला.
महायुतीच्या इतर नेत्यांकडून खिल्ली
याच दरम्यान महायुतीच्या इतर नेत्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडविली. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आघाडीवर राहिले. महाराष्ट्रातले साखर कारखानदार जोपर्यंत ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम देत नाहीत, तोपर्यंत रोहित पवारांनी अन्नत्याग आंदोलन करत राहावे. सोलापूरच्या पोलीस जिल्हाप्रमुखांना माझे आवाहन आहे की त्यांनी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलना भोवती पूर्ण सुरक्षा लावून रोहित पवारांना अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नये. रोहित पवारांना एक दोन महिने अन्नत्याग आंदोलनाला बसूच द्यावे, असा जोरदार टोला गोपीचंद पडळकर यांनी हाणला. त्या पलीकडे जाऊन गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना सुद्धा जोरदार शरसंधान साधले. रोहित पवार यांच्या आजोबांनी आणि रोहित पवारांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे सगळे फळे लुटून खाल्ले, असे टीकास्त्र पडळकर यांनी सोडले. रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन हे नटरंग सिनेमाचे शूटिंग आहे. रोहित पवारांना एक्टिंग करायचं चांगले माहिती आहे, अशा शब्दांमध्ये पडळकर यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली. राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर टीका केली. रोहित पवार हे अजित पवार यांची जागा घेण्यासाठी प्रयत्न करतायेत, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.
मनोज जरांगे आंदोलनाला भेट द्यायची शक्यता
भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला निव्वळ राजकीय स्टंट असल्याचे नाव दिले. त्याचवेळी रोहित पवार यांच्या आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे भेट देणार असल्याची बातमी आली. त्यामुळे रोहित पवारांच्या आंदोलनाला वेगळाच राजकीय आणि सामाजिक रंग चढला. ते फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केलेले अन्नत्याग आंदोलन राहिले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App