योगींचा कायद्याचा बडगा; उत्तर प्रदेशात बकरी ईदच्या कुर्बानीला सार्वजनिक ठिकाणी बंदी; रस्त्यावरचे नमाज पठण बंद म्हणजे बंद!!

विशेष प्रतिनिधी

लखनौ : उत्तर प्रदेशात बकरी ईद शांततेत आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून साजरी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. बकरी ईदच्या काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास पूर्णपणे बंदी असेल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत रस्ते अडवून नमाज पठण करता येणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला. त्यात त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीत केवळ सण उत्सवांची तयारीच नाही, तर जनतेच्या तक्रारींचे निवारण, गंगा दसरा आणि बेकायदेशीर कामांविरोधातील कारवाई अशा अनेक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

प्रतिबंधित प्राण्यांच्या कुर्बानीवर पूर्ण बंदी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की, बंदी असलेल्या प्राण्यांची कुर्बानी देणाऱ्यांवर “झिरो टॉलरन्स” धोरणांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. जिल्हा प्रशासनाने केवळ आधीपासून निश्चित केलेल्या ठिकाणीच कुर्बानी देण्याची परवानगी द्यावी. कोणत्याही नवीन परंपरेला किंवा पद्धतीला परवानगी दिली जाणार नाही. नमाज पठण केवळ पारंपरिक आणि निश्चित केलेल्या धार्मिक स्थळांवरच केले जावे. रस्त्यांवर रहदारी रोखून नमाज पठण करण्यास सक्त मनाई असेल.

स्वच्छता आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

सण साजरा करताना नागरिकांना त्रास होऊ नये आणि कायदा‌ सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या.

कुर्बानीनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची आणि अवशेषांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली पाहिजे.

उघड्यावर मांस विक्री करण्यास सक्त मनाई असेल. बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि अधिकृत कत्तलखान्यांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त प्राणी ठेवता येणार नाहीत.

संवेदनशील भागांत तात्काळ ‘फ्लॅग मार्च’ सुरू करावा. धार्मिक स्थळांच्या परिसरात पायी गस्त वाढवावी. वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.

अलिगड, बिजनोर, सहारनपूर, रामपूर आणि संभल या संवेदनशील जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी जुन्या घटनांचा अभ्यास करून संभाव्य समाजकंटकांवर आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

आता दर आठवड्याला चौपाल

प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता राज्यातील प्रत्येक विकास गट पातळीवर दर आठवड्याला ‘साप्ताहिक चौपाल’ आयोजित केली जाईल.

जमिनीचे वाद, घरगुती हिंसाचार, बेकायदेशीर वसुली आणि पोलीस ठाण्यात नोंद न झालेल्या तक्रारींची दखल या चौपालमध्ये घेतली जाईल. तसेच, सरकारी योजनांपासून वंचित असलेल्या पात्र नागरिकांना थेट लाभ दिला जाईल. तक्रारींचे निवारण केवळ कागदावर न दाखवता, नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळणे गरजेचे आहे, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली.

गंगा दसऱ्याची तयारी आणि कडक उन्हाचे आव्हान

आगामी ‘गंगा दसरा’ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रयागराज, वाराणसी, अयोध्या, चित्रकूट, हापूर, मुझफ्फरनगर आणि अमरोहा येथील घाट स्वच्छ ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सध्याची कडक उन्हाची लाट पाहता घाटांवर भाविकांसाठी सावलीची व्यवस्था, बॅरिकेडिंग, रुग्णवाहिका आणि पार्किंगचे चोख नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. भाविकांची सुरक्षा आणि सुविधा हीच प्रशासनाची प्राथमिकता असली पाहिजे, असे ते म्हणाले.

– गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी महत्त्वाचे आदेश

बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन केला जाईल.

भूमाफियांवर कठोर कारवाई करताना कोणत्याही निष्पाप नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. नंबर प्लेट नसलेल्या वाहनांविरोधात संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबवली जाईल.

इतर महत्त्वाचे निर्णय

‘ज्ञान भारतम मिशन’ अंतर्गत राज्यात आतापर्यंत तब्बल १२ लाख हस्तलिखितांची (Manuscripts) ओळख पटवण्यात आल्याची माहिती मुख्य सचिवांनी या बैठकीत दिली.

योगींचाचा बडगा; उत्तर प्रदेशात बकरी ईदच्या कुर्बानीला सार्वजनिक ठिकाणीबंदी

Yogi’s legal challenge; Bakri Eid sacrifice banned in public places in Uttar Pradesh

महत्वाच्या बातम्या


	Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात